गावातील आदरणीय व्यक्तीमत्त्वाचा वाढदिवस 75 कल्पवृक्ष लावून साजरा...

     

 तुकाराम केरु कार्ले यांचा वाढदिवस 75 कल्पवृक्ष लावून साजरा...खंडाळा येथील जेष्ठ नागरिक तुकाराम केरु कार्ले यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने कार्ले कुटुंब व मित्रानी त्यांचा वाढदिवस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेगळ्याच पद्धतीने म्हणजे गावामधये 75 कूटुंबाच्या घरी 75 कल्पवृक्ष लागवड करुन साजरा करण्याचे ठरवले. त्यानूसर   ग्रामपंचायतच्या स्पीकर वर ग्रामस्थ याना  तुकाराम कार्ले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कल्पवृक्षाची रोपे लागवड करन्यासाठी देणार असल्याचे सांगितले.  त्या नुसार गावातील महिला,नागरिक,तरुण लहान मोठे सर्व उपस्थीत राहिले व 75 कूटुंबाच्या घरी कल्पवृक्ष लागवड करुन साजरा केला.  ते  गेले 34 वर्ष सातत्याने सकाळ संध्याकाळ गावातील मारुती व दत्तमंदिरात साफसफाई व आरती नित्यनेमाने कोरोना काळ वगळता केली

       खंडाळा ग्रामस्थनी केलेल्या वाढदिवसानिमित्त उपक्रमाचे कौतुक केले जात आहे. ह्या वेळी गावातील सरपंच,उपसरपंच,,नातेवाईक त्यांच्यावर प्रेम करणारे ग्रामस्थ,जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे,खारे कर्जुनेचे उप सरपंच अंकुश शेळके,व ईतर अनेक लोक उपस्थित होते

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post