सोनं झालं स्वस्त...चार महिन्यातील निचांकी पातळीवर

सोनं झालं स्वस्त...चार महिन्यातील निचांकी पातळीवर नवी दिल्ली :  ऑगस्टमध्ये सोन्याचे दर गेल्या 4 महिन्यातील निचांकी पातळीवर आहेत.   सोन्याची वायदे किंमत  तीन ट्रेडिंग सेशनमध्ये जवळपास 1.3 टक्के तर चांदीची किंमत 1.5 टक्क्यांनी कमी झाली आहे. गुरुवारी 12 ऑगस्ट रोजी  मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर ऑक्टोबरच्या डिलिव्हरीच्या सोन्याचे दर सकाळी 9.30 वाजता 0.12 टक्क्यांनी कमी झाले आहेत. यानंतर सोन्याचे दर 46,334 रुपये प्रति तोळावर ट्रेड करत आहेत.

दरम्यान सप्टेंबरच्या डिलिव्हरीसाठी चांदीची वायदे किंमत 0.36 टक्क्यांनी कमी झाली आहे. या घसरणीनंतर चांदीचे दर 62,544 रुपये प्रति किलो आहेत. सोन्याचे दर गेल्यावर्षीच्या ऑल टाइम हायपेक्षा अद्यापही 10000 रुपयांनी कमी आहेत. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये सोन्याचे दर 56200 रुपये प्रति तोळाच्या स्तरावर पोहोचले होते. आणि आता  सोन्याचे दर जवळपास 46,334 रुपये प्रति तोळा आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post