लाच प्रकरणी अडकलेल्या महिला शिक्षणाधिकारी एसीबीने केली अटक

 लाच प्रकरणी अडकलेल्या महिला शिक्षणाधिकारी एसीबीने केली  अटक नाशिक : शिक्षण संस्था चालकांकडून मंजुरीच्या कामासाठी चालकामार्फत 8 लाख रुपयांची लाच घेणाऱ्या नाशिकच्या शिक्षणाधिकारी पोलिसांच्या जाळ्यात सापडल्यात. एसीबीने त्यांना अटक केलीय. त्यामुळे आता त्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. विशेष म्हणजे आजच त्यांनी वकिलामार्फत अटकपूर्व जामिनासाठीही अर्ज केला होता.

शिक्षण संस्था चालकांकडून मंजुरीच्या कामासाठी चालकामार्फत 8 लाख रुपयांची लाच घेणाऱ्या नाशिकच्या शिक्षणाधिकारी पोलिसांच्या जाळ्यात सापडल्यात. एसीबीने त्यांना अटक केलीय. त्यामुळे आता त्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.

दरम्यान, शिक्षण संस्थेच्या सरकारी अनुदानला मंजुरी देण्यासाठी 8 लाख रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडल्या गेलेल्या नाशिकच्या शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांचा पाय आणखी खोलात गेलाय. लाचखोर शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांच्याकडे कोट्यवधींची ‘माया’ असल्याचं समोर येतंय. विशेष म्हणजे शासनाने देखील शिक्षण आयुक्तांना वैशाली झनकर यांच्या निलंबनाचे आदेश दिलेत. त्यामुळे आता शिक्षण आयुक्त काय भूमिका घेतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post