तेंडुलकर, गावस्कर, कोहलीला जे जमलं नाही ते के.एल.राहुलनं करून दाखविले...


तेंडुलकर, गावस्कर, कोहलीला जे जमलं नाही ते के.एल.राहुलनं करून दाखविले... लॉर्ड्स : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या दिवसावर टीम इंडियाचं वर्चस्व होते. केएल राहुलच्या  शतकाच्या जोरावर टीम इंडियानं पहिल्या दिवसाच्या अखेरीस 3 आऊट 276 रन काढले. राहुल पहिल्या दिवसाच्या अखेरीस 127 रनवर नाबाद आहे. राहुलनं 248 बॉलमध्ये 12 फोर आणि 1 सिक्स लगावत दिवसभर किल्ला लढवला

लॉर्ड्सच्या मैदानाला असलेली ऐतिहासिक पार्श्वभूमी लक्षात घेता या मैदानावर शतक झळकावण्याची प्रत्येक बॅट्समनची इच्छा असते. सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर या दिग्गजांना लॉर्ड्सवर आजवर शतक झळकावता आले नाही. तर टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीचा लॉर्ड्सवरील रेकॉर्ड निराशाजनक आहे. रोहितनं मात्र लॉर्ड्सवरील पहिल्याच इनिंगमध्ये आत्मविश्वासनं खेळ केला. विनू मंकड, दिलीप वेंगसरकर, गुंडप्पा विश्वनाथ, रवी शास्त्री, मोहम्मद अझहरुद्दीन, सौरव गांगुली, अजित आगरकर, राहुल द्रविड अजिंक्य रहाणे  या भारतीयांच्या यादीत आता केएल राहुलचा समावेश झाला आहे. लॉर्ड्सवर शतक झळकावणारा राहुल हा दहावा भारतीय आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post