शेतकर्‍यांसाठी खूषखबर...मोदी सरकार पीएम किसान सन्मान निधी दुप्पट...

शेतकर्‍यांसाठी खूषखबर...मोदी सरकार पीएम किसान सन्मान निधी दुप्पट करणार?

 


नवी दिल्ली : पंतप्रधान किसान सन्मान निधी  योजनेअंतर्गत लाभ देणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच २००० रुपयांच्या ऐवजी ४००० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात येऊ शकतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मोदी सरकार लवकरच लाभार्थी शेतकऱ्यांना गिफ्ट देऊ शकते.


रिपोर्टनुसार, केंद्र सरकार पंतप्रधान किसान सन्मान निधी रकमेत दुप्पट करण्याचा विचार करीत आहे. असे झाल्यास शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांऐवजी तीन हप्त्यांमध्ये १२ हजार रुपये मिळू शकतात. मीडिया रिपोर्टनुसार, बिहारचे कृषीमंत्री अमरेंद्र प्रताप सिंह यांनी अलीकडेच केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण सीतारमण  यांची दिल्लीत भेट घेऊन पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत रक्कम दुप्पट करण्यासंदर्भात चर्चा केली. मात्र, अद्याप यावर कोणताही निर्णय झालेला नाही.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post