शिवसेनेच्या प्रयत्नातून कायनेटिकच्या सेवानिवृत्त कामगारांना न्याय, मिळाले 1 कोटीचे धनादेश

 तीन वर्षापासून अडकलेले एक कोटी रुपयांचे ग्रॅज्युटी चेक कायनेटिक कंपनीतील सेवा निवृत्त कामगारांना देण्यात आले...कायनेटिक कंपनीमधील सेवानिवृत्त कामगार गेल्या ३ ते ४ वर्षांपासून सेवानिवृत्त झालेले असून हक्काची ग्रॅज्यूटी रक्कम व्याजासह देण्यास कंपनी टाळाटाळ करत असल्यामुळं गेल्या दहा दिवसा पासुन कायनेटीक कंपनी कामगारांचे बेमुदत उपोषण चालु होते. शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते, विक्रम अनिलभैय्या राठोड , महापौर अभिषेक कळमकर, बाळासाहेब बोराटे, परेश लोखंडे , संतोष गेनप्पा, भगवान फुलसौंदर, दत्ता जाधव , अमोल येवले, संग्राम कोतकर व शिवसेनेच्या नगरसेवक यांच्या मध्यस्थीने कंपनी अधिकारी व कामगार यांचा समेट शिवसेनेच्या वतीने घडवण्यात आला व कामगारांना आज सुमारे 1 कोटी रुपयांचे चेक शिवालय या ठिकाणी  सुपूर्द करण्यात आले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post