कोतवाली पोलीस चौकी अहमदनगर येथे केडगाव जागरुक मंचच्या वतीने रक्षाबंधन

 कोतवाली पोलीस चौकी  अहमदनगर येथे केडगाव जागरुक मंचच्या वतीने रक्षाबंधन
केडगांव जागरूक नागरिक मंच च्या महिला सदस्यांनी पोलिस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला.सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीद जपत अविरत समाजाची सेवा व रक्षण करणाऱ्या पोलीस बांधवां प्रती कृतज्ञता व्यक्त केली. पोलीस हे सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी अहोरात्र झटत असतात आणि त्यातच कोरोना महामारीत  समाजाला वाचवण्यासाठी समर्पित भावनेने केलेलं अथक प्रयत्न अविस्मरणीय आहे . राष्ट्र व समाज प्रथम म्हणत पोलीस समाजाला कुटुंब करतो व आपलं कर्तव्य करत राहतो , सामाजिक  कर्तव्य  समजून मंचाने पोलिस कुटूंबा सोबत सण साजरा केला. अश्या भावना मंचचे अध्यक्ष विशाल पाचारणे यांनी व्यक्त केल्या. पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर साहेब,सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे साहेब यांनी नारळी पौर्णिमा रक्षाबंधनच्या सर्व पोलिस बांधवांना तसेच मंच सदस्यांना शुभेच्छा दिल्या प्रसंगी कोतवालीचे पोलीस बांधव, खजिनदार प्रवीण पाटसकर,शारदा शिरसाठ, अंबिका कंकाळ व मंच चे सदस्य उपस्थित होते

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post