करोनामुळे पतीचा मृत्यु, नंतर दिराने केला बलात्कार...तक्रार दिल्यावर केली मारहाण

करोनामुळे पतीचा मृत्यु, नंतर दिराने केला बलात्कार...तक्रार दिल्यावर केली मारहाण कानपूर - उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये कोरोनामुळे पतीचा मृत्यू झाल्यानंतर विधवा पत्नीसोबत धक्कादायक घटना घडली आहे. पीडितेसोबत दिराने बलात्कार केला. त्यानंतर पीडित महिलेने याबाबत पोलीस ठाण्यात दाद मागितली. पोलिसांनी तक्रार नोंदवली त्यानंतर पीडित महिला घरी परतल्यानंतर दिरानं त्यांच्या बहिणींसोबत मिळून वहिनीला सगळ्यांसमोर ओढत भररस्त्यात मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

कानपूरच्या विनायक पूरमध्ये भररस्त्यात मारहाण केलेल्या या पीडित महिलेसोबत दिरानं बलात्कार केला होता. काही दिवसांपूर्वीच पीडित महिलेच्या पतीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पीडितेने दिराच्या करकुतीबाबत पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. त्याचा राग धरत दिराने जेव्हा वहिनी पोलीस स्टेशनमधून माघारी घरी परतली तेव्हा दोन बहिणींसोबत मिळून तिला बेदम मारहाण केली. पोलिसांनी आरोपी दिर आणि त्याच्या बहिणींवर गुन्हा दाखल केला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post