आ. लंके व काँग्रेसचे किरण काळे यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा...राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

 आ. लंके व काँग्रेसचे किरण काळे यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा...राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण  नगर - नगर शहरामध्ये विखे-जगताप राजकीय सहमती एक्सप्रेस सुरू आहे. भाजप खा. सुजय विखे यांनी स्वतः नगर शहरात काही दिवसांपूर्वी झालेल्या कार्यक्रमात याबद्दल भाष्य केले होते. यावेळी त्यांनी आ. निलेश लंके यांच्यावर नाव न घेता टीका देखील केली होती.  अशातच आता नगर शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी नुकतीच राष्ट्रवादीचे आ.निलेश लंके यांची सदिच्छा भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे

आ.लंके यांच्या हंगा येथील कार्यालयात ही भेट झाली. यावेळी लंके यांनी किरण काळे आणि शहर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा  सत्कार केला. 
यावेळी किरण काळे यांनी आ.लंके यांनी कोरोना संकट काळात शरदचंद्र पवार आरोग्य केंद्राच्या माध्यमातून कोरोनाग्रस्तांसाठी केलेल्या कार्याचा गौरव केला. स्व. अनिलभैय्या राठोड यांच्या प्रमाणेच पारनेर विधानसभा मतदारसंघांमध्ये आ.लंके हे सर्वसामान्य माणसाच्या गळ्यातले ताईत बनले आहेत. चोवीस तास उपलब्ध असणारा आणि तत्परतेने मदतीला धावून येणारा आमदार म्हणून लंके यांनी अल्पावधीमध्ये लौकिक मिळविला आहे, असे काळे म्हणाले.
या भेटीदरम्यान आमदार निलेश लंके आणि काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यामध्ये सुमारे पंधरा मिनिटे बंद दाराआड चर्चा झाली.  
यावेळी काळे यांच्या समवेत आ. लंके यांनी ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज गुंदेचा, शहर जिल्हा उपाध्यक्ष खलील सय्यद, शहर जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदे, नगर तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष ॲड. अक्षय कुलट, शहर क्रीडा काँग्रेस अध्यक्ष प्रवीणभैय्या गीते पाटील, विद्यार्थी काँग्रेस तालुकाध्यक्ष सुजित जगताप यांचा देखील सत्कार केला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post