धक्कादायक...काबूल विमानतळावरुन 150 भारतीयांच्या अपहरणाची चर्चा, तालिबाननं केला इन्कार

धक्कादायक...काबूल विमानतळावरुन 150 भारतीयांच्या अपहरणाची चर्चा, तालिबाननं केला इन्कार अफगाणिस्तानात तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर भारतासाठी मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. काबुल विमानतळावर मायदेशात परतण्यासाठी वाट पाहत असलेल्या शेकडो भारतीय नागरिकांचं तालिबानकडून अपहरण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अफागाणिस्तानच्या माध्यमांबाबत याबाबतचं वृत्त प्रसारित केलं जात असल्याची माहिती एएनआय या वृत्त संस्थेनं दिलं आहे. भारताकडून मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तर तालिबानी नेत्यांनीही या वृत्ताचं खंडन केलं असून भारतीय नागरिकांना सुखरूपरित्या काबुल विमानतळाच्या आत सोडल्याचा दावा केला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, तालिबान्यांच्या वतीनं दावा करण्यात आला आहे की, सर्व लोकांना काबूल विमानतळाच्या आतमध्ये नेण्यात आलं आहे. तालिबान्यांनी म्हटलं आहे की, सर्व नागरिकांना दुसऱ्या गेटनं विमानतळाच्या आतमध्ये नेण्यात आलं आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post