काबुल हल्ल्यामागील मुख्य सूत्रधाराचा 48 तासात खात्मा, अमेरिकेचे एअर स्ट्राईक

काबुल हल्ल्यामागील मुख्य सूत्रधाराचा 48 तासात खात्मा, अमेरिकेचे एअर स्ट्राईक  काबुल : अफगाणिस्तानमधील काबुल विमानतळावर आत्मघातकी हल्ला करणाऱ्या आयसिस-के संघटनेच्या मोरक्यावर अमेरिकेने एअर स्ट्राईक केलंय. अमेरिकेने मानवरहित ड्रोनच्या मदतीने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये काबुल हल्ल्यामागील मुख्य सूत्रधाराचा 48 तासात खात्मा केल्याचा दावा केलाय. या कारवाईत नांगरहारमधील आयसिसच्या ठिकाणांवर हल्ला करण्यात आला.


अमेरिकेच्या एअर स्ट्राईक कारवाईनंतर आयसिसकडून प्रत्युत्तराची शक्यता आहे. हे लक्षात घेत अमेरिकेने काबुल विमानतळाच्या गेटवरील नागरिकांना जागा सोडण्यास सांगितलंय. अमेरिकेचे प्रवक्ते कॅप्टन बिल अर्बन यांनी या कारवाईची माहिती देताना सांगितलं, “अमेरिकेच्या सैन्याने काबुल हल्ल्यामागील इस्लामिक स्टेट-खुरासानच्या (आयएसके) मुख्य सूत्रधाराविरोधात कारवाई केली. यात अफगाणिस्तानमधील नांगरहार प्रांतात मानवरहित हवाई हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार संबंधित दहशतवाद्याचा खात्मा झालाय. यात सर्वसामान्य नागरिकांचा मृत्यू झाल्याची कोणतीही माहिती नाही.”

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post