नगर तालुक्यातील ‘या’ महाविद्यालयाचे नॅक कमिटीकडून मूल्यांकन...ग्रामीण भागातील पहिलेच कॉलेज...

 जनता कला व विज्ञान महाविद्यालयाची राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषद (नॅक) कडून मुल्यांकन

 

ग्रामीण भागातील विनाअनुदानित महविद्यालयात नॅक तर्फे मुल्यांकन करणारे जिल्हयात पहिले महाविद्यालय
नगर :अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे रुईछत्तिसी, (ता. जि. अहमदनगर ) येथील जनता कला व विज्ञान महाविद्यालयास दि. २६  व २७ ऑगस्ट २०२१ रोजी बंगळूरू येथील राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषद (नॅक) च्या त्रिसदस्यीय समिती ने भेट देऊन महाविद्यालयाचे मुल्यांकन केले . समिती चे अध्यक्ष  ओरीसा भुवनेश्वर येथील इंडियन इन्स्ट्युटीट ऑफ टुरीझम ॲण्ड ट्राव्हल मॅनेजमेंट चे संचालक डॉ. सितीकांथा मिश्रा हे होते . समिती समन्वयक उतराखंड मधील अल्मोडा येथील कुमाऊ विद्यापीठाचे भौतिकशास्त्र विभाग प्रमुख  डॉ प्रवीण सिंग बिष्ट तर समिती के सदस्य डॉ. स्वेबर्ट डिसिल्वा (प्राचार्य, सेंट जोसेफ कॉलेज ऑफ लॉ, बेंगळुरू, कर्नाटक. ) आदीचा समावेश होता .

       

     समितीचे आगमन होताच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुरेश बाबर आणि समन्वयक प्रा रविराज सुपेकर यानी समिती सदस्यांचे स्वागत केले . यावेळी महाविद्यालायाचे सर्व प्राध्यापक आणि कर्मचारी उपस्थित होते .

        दोन दिवासात नॅक समितीने महाविद्यालयासी संबंधीत शिक्षक, विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी इत्यादी घटकांबरोबर संवाद साधला व महाविद्यालया विषयी  त्यांच्या अपेक्षा व मते जानुन घेतली . त्याच बरोबर महाविधालयात आवश्यक त्या शैक्षणिक सुविधा, प्रयोगशाळा, ग्रंथालय, तांत्रिक सुविधा, इंटरनेट सुविधा यासारख्या अत्यंत सुक्ष्म बाबीची शहानिशा करून महाविद्यालयाचे मुल्याकन केले . या दोन दिवसांतील महाविदयालयाच्या निरीक्षण परीक्षण करून केलेल्या गोपनीय अहवाल बंगळूरू येथील राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषद (नॅक) स सादर केला . त्यानुसार लवकरच महाविद्यालयाच्या गुणवते विषयी प्राप्त गुंणाकना नुसार श्रोणी मिळणार आहे .

  

      नॅक कडुन महाविद्यालयाचे मुल्याकन करून घेण्या साठी महाविद्यालय अथवा शैक्षणिक संस्थेस प्रथम अपला एसएसआर ( सेल्फ स्टडी रिपोर्ट ) तयार करून नॅक कार्यालयास सादर करावा लागतो . नॅक ला तो रिपोर्ट योग्य वाटल्यास अशा महाविद्यालयाच्या मुल्यांकनास अनुमति मिळते. अशा प्रकारे नॅक कडून मुल्यांकन करनारे ग्रामीण भागातील व पूर्णपणे विनाअनुदानित असलेले जनता कला व विज्ञान महाविद्यालय हे जिल्ह्यातील पहिलेच महाविद्यालय असावे . महाविद्यालयाने अत्यंत कमी कालावधीत म्हणजेच स्थापने नंतर अवध्या नऊ वर्षात हे मुल्यांकन करून घेतले आहे .


        संस्था पदाधिकारी पाठबळामुळे, मार्गदर्शन आणि आर्थिक सहयोगामुळे महाविद्यालयाचे इतक्या कमी कालवधीत नैक मुल्यांकन करणे शक्य झाले . सर्व गावकरी, महाविदयालयातील सहकारी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आदिचे सक्रीय सहभाग आणि सहकार्य लाभले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post