शिवसेनेला धक्का.. महिला आमदाराचे विधानसभा सदस्यत्त्व धोक्यात

 

शिवसेनेला धक्का...‘या’ महिला आमदाराचे विधानसभा सदस्यत्त्व धोक्यातमुंबई : शिवसेनेच्या भायखळ्याच्या आमदार यामिनी यशवंत जाधव  अडचणीत आल्या आहेत. आयकर विभागाने त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केलीय. 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी आपल्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीविषयी चुकीची माहिती दिल्याचा ठपका देऊन आयकर विभागाने त्यांचं विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. 

2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी यामिनी जाधव यांनी आपल्या संपत्तीबाबत चुकीची माहिती दिल्याचं आयकर विभागाचं म्हणणं आहे. त्यांच्या प्रतिज्ञापत्राची तपासणी केली असता, ही बाब उघड झाल्याचंही आयकर विभागाने सांगितलं आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post