१ लाख ४७ हजारांची लाच, जिल्ह्यातील 'या' कॉलेजचा प्राचार्य आणि लिपिक 'एसीबी' च्या जाळ्यात

नगर जिल्ह्यातील  'या' कॉलेजचा प्राचार्य आणि लिपिक 'एसीबी' च्या जाळ्यात




यशस्वी सापळा अहवाल


▶️ युनिट - अहमदनगर

▶️ तक्रारदार- पुरुष  वय- ४९ रा.झोडेगांव, ता- गंगापूर, जिल्हा औरंगाबाद

▶️ *आरोपी = १) बापुसाहेब बाळासाहेब हरिश्चंद्रे, ५२ वर्ष, धंदा - नौकरी, प्रभारी प्राचार्य, होमिओपॅथी मेडीकल कॉलेज, वडाळा महादेव, ता- श्रीरामपूर. रा. मानूर , ता-राहुरी, जिल्हा- अहमदनगर, वर्ग १

२) भारती बापुसाहेब इथापे, वय ३४, धंदा- नौकरी, लिपीक, होमिओपॅथी मेडीकल कॉलेज, वडाळा महादेव,ता.श्रीरामपूर, जिल्हा- अहमदनगर.

 राहणार-  निपाणी वडगांव, ता- श्रीरामपूर, जिल्हा -अहमदनगर

▶️ लाचेची मागणी-₹ १,४७,५००/-

▶️ लाचेची मागणी - दि- १२/०८/२०२१

▶️ लाच स्विकारली रक्कम- ₹ १,४७,५००/-

▶️ लाच स्विकारली दिनांक- १२/०८/२०२१

▶️   लाचेचे कारण - यातील तक्रारदार यांच्या मुलीचे बी.एच.एम.एस पदवीचे पासिंग सर्टिफिकेट व इंटरशिप पुर्ण केल्याबाबतचे सर्टिफिकेट देणे करिता यातील आरोपी लोकसेवक क्रमांक १ यांनी तक्रारदार व त्यांची मुलगी यांचे कडे ₹ १,४७,५००/- ची मागणी केली.तक्रारदार यांनी ला प्र विभागाकडे दि १०/०८/२०२१ रोजी दिलेल्या तक्रारीवरून आज रोजी केलेल्या लाच मागणी पडताळणी मध्ये आरोपी लोकसेवक क्रमांक १ यांनी तक्रारदार व त्यांची मुलगी यांचे कडे बी.एच.एम.एस पदवीचे 

पासिंग सर्टिफिकेट व इंटरशिप पुर्ण केलेल्या कालावधीच्या हजेरीची ॲडजस्टमेंट करुन सर्टिफिकेट देणे करिता होमिओपॅथी मेडीकल कॉलेज वडाळा महादेव येथे पंचासमक्ष ₹ १,४७,५००/- ची मागणी केली. त्यानंतर आयोजित सापळा कारवाई दरम्यान सदर लाचेची रक्कम आरोपी लोकसेवक क्रमांक १ यांचे सांगणे वरुन आरोपी लोकसेवीका क्रमांक २ यांनी पंचासमक्ष स्विकारली असता दोन्ही आरोपी यांना रंगेहाथ पकडण्यात आले. श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.

▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली  आहे

▶️ सापळा अधिकारी:-.श्याम पवरे, पोलीस निरीक्षक ला.प्र.वि, अहमदनगर

 ▶️  पर्यवेक्षण अधिकारी -*   हरीष खेडकर, पोलीस उप अधीक्षक,  ला.प्र. वि.अहमदनगर

▶ सापळा पथक:-  दिपक करांडे, पोलीस निरीक्षक, पो हवा.संतोष शिंदे, पो ना.रमेश चौधरी, पो अंमलदार रविंद्र निमसे, वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, महिला पोलीस अंमलदार संध्या म्हस्के,चालक पोलीस हवालदार हारुन शेख, पोलीस नाईक- राहुल डोळसे.

▶ *मार्गदर्शक -*मा.श्री सुनील कडासने सो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक

▶मा.श्री निलेश सोनवणे सो, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि नाशिक.

 ▶️ मा.श्री.सतिश भामरे, वाचक पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. नाशिक.

▶ आरोपीचे सक्षम अधिकारी: मा.संचालक, उच्च शिक्षण विभाग.

-------•••••••••••••••••••••••--------

 सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.

अँन्टी करप्शन ब्युरो, अहमदनगर

दुरध्वनी- ०२४१- २४२३६७७

@ टोल फ्रि क्रं. १०६४

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post