खा.विखेंच्या कामाची पध्दत वेगळी आहे, बाजार समितीत भ्रष्टाचार करणार्‍यांना त्याची प्रचिती लवकरच येईल...

 खा.विखेंच्या कामाची पध्दत वेगळी आहे, बाजार समितीत भ्रष्टाचार करणार्‍यांना त्याची प्रचिती लवकरच येईल...

नगर तालुक्यातील साकत येथील अंगणवाडीच्या नवीन खोलीचे लोकार्पणनगर : नगर बाजार समितीच्या जागा व गाळे विकून पोट भरणारे न केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात. आम्ही केलेल्या कामांच्या ठिकाणी फोटो सेशन करून जातात. पण जनतेला सर्व माहिती आहे. आज बाजार समितीत सत्तेत असलेली मंडळी खा.डॉ.सुजय विखे यांच्या सोबत फिरतात. पण खा.विखेंच्या कामाची पध्दत वेगळी आहे. लोकसभा निवडणुकीवेळी कोणी काय केले हे त्यांना चांगले माहिती आहे. ते काहीही विसरलेले नाहीत. योग्य वेळी सगळं बरोबर करतील. याची प्रचितीही बाजार समितीला लुटणार्‍यांना लवकरच येईल. साकत गावाच्या विकासासाठी तरूणाई पुढे येत असून त्यांना ताकद देण्याचे काम येणार्‍या काळात केले जाईल. गावासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असे प्रतिपादन माजी जि.प.सदस्य बाळासाहेब हराळ यांनी केले. 

जि.प.सदस्या अनिता हराळ यांच्या प्रयत्नातून नगर तालुक्यातील साकत खु.येथे नवीन अंगणवाडी खोली उभारण्यात आली आहे. या कामाच्या लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी हराळ बोलत होते. यावेळी शिवसेना नेते संदीप गुंड, पंचायत समिती उपसभापती डॉ.दिलीप पवार, रवींद्र भापकर, सरपंच जाईबाई केदारे,योगेश लांडगे उपसरपंच पिंपळगांव लांडगा, ललिता पवार, स्वाती पाठक, लक्ष्मण कार्ले, सूर्यभान निमसे, शिवाजी शिंदे, अशोक गायकवाड, शरद निमसे, अक्षय कार्ले, बाळासाहेब बेरड, संभाजी पवार, बाळासाहेब गायकवाड, बबन शिंदे, शिवाजी चितळकर, शाखा अभियंता मच्छिंद्र झावरे, संपत वाघमोडे आदी उपस्थित होते.

संदीप गुंड म्हणाले की, नगर तालुक्यात महाविकास आघाडी भक्कम असून सर्वसामान्यांचा आघाडीवर विश्वास आहे. जनतेच्या प्रश्नांची जाण आघाडीला आहे. विरोधकांनी कितीही आव आणला तरी जनता भूलथापांना बळी पडणार नाही. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक गावात भरीव विकासकामे करण्यात येत आहे. प्रास्ताविक व आभार संपत वाघमोडे यांनी केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post