बॉयफ्रेण्डने दुसऱ्याच मुलीसोबत लग्नगाठ बांधल्याचा राग, 22 वर्षीय तरुणीचा गळफास

 बॉयफ्रेण्डने दुसऱ्याच मुलीसोबत लग्नगाठ बांधल्याचा राग, पुण्यात 22 वर्षीय तरुणीचा गळफासपुणे : बॉयफ्रेण्डने दुसऱ्याच मुलीसोबत लग्न केल्यामुळे नैराश्यातून युवतीने आत्महत्या केली. पुण्यात 22 वर्षीय तरुणीने गळफास घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या प्रकरणी आरोपी प्रियकरासह त्याच्या आई वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मनिषा गोविंद गायकवाड असं 22 वर्षीय तरुणीचं नाव आहे. ती पुण्यातील फुरसुंगी परिसरात राहत होती. गेल्या काही दिवसांपासून हडपसर भागात राहणाऱ्या 23 वर्षीय युवकासोबत तिचे प्रेमसंबंध होते. याविषयी तरुणाच्या आई वडिलांनाही माहिती असल्याचा दावा केला जातो.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post