डाक कर्मचाऱ्यांनी ग्राहकांना अधिकाधिक ग्राहकाभिमुख सेवा देण्याचा प्रयत्न करावा, श्री एस रामकृष्ण

 डाक कर्मचाऱ्यांनी ग्राहकांना अधिकाधिक ग्राहकाभिमुख सेवा देण्याचा प्रयत्न करावा

          श्री एस रामकृष्ण 

 गुणवंत कर्मचारी सत्कार सोहळा



अहमदनगर: भारतीय डाक विभाग अहमदनगर यांचे द्वारे मागील वर्षांपासून आजतायत उत्कृष्ट काम करण्याऱ्या कर्मचाऱ्याचा विशेष गौरव भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत प्रधान डाकघर अहमदनगर याठिकाणी श्री एस रामकृष्ण प्रवर  डाक अधीक्षक अहमदनगर यांचे शुभहस्ते करण्यात आला.

   याप्रसंगी बोलताना श्री रामकृष्ण यांनी उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव करत आगामी काळात याही पेक्षा चांगले काम करत आपल्या अनमोल ग्राहकांना अधिकाधिक ग्राहकाभिमुख  सेवा देण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन केले.

यावेळी महिला प्रधान अभिकर्ते ,ग्रामीण डाक सेवक, सबपोस्टमास्तर,अधिकारी या प्रवर्गातील उत्कृष्ट काम करणाऱ्याचा विशेष गौरव करण्यात आला.

फेब्रुवारी ते मार्च दरम्यान ध्येय लक्ष्य प्राप्ती या योजनेअंतर्गत पुणे विभागात दिड लाख नवीन खाते उघडण्याचे उद्दिष्ट देण्यात आलेले होते,त्यात अहमदनगर विभागास दहा हजार नवीन खाते उघडण्याचे उद्धिष्ट असताना अहमदनगर विभागात 12700 नवीन खाते उघडून भरघोस प्रतिसाद दिला.

नुकताच मिशन रेपीड मध्ये 5 दिवसात अहमदनगर विभागात 2500 चे उद्धिष्ट असताना 4000  नवीन खाते उघडले गेले.

यासह पोस्टल लाईफ इन्शुरन्स, ग्रामीण डाक जीवन विमा,पोस्टल बॅंक मध्ये नवीन खाते ,बँकेच्या खातेदारास पोस्टऑफिस मध्ये मोबाईल द्वारेपैसे काढणे (AEPS) या सर्व  योजनेत विशेष कामगिरी करणारे सर्वश्री संतोष यादव,रामेश्वर ढाकणे, श्रीमती पल्लवी मळेकर,प्रकाश कदम,प्रितम वराडे, अजित रायकवाड अशोक बंडगर,श्री संदीप घोडके,श्री सतिष सोनवणे, सोमनाथ तांबे,इरफान पठाण ,पिरमोहमद चौगुले,नवनाथ चोरमले,

विशाल म्हस्के,कल्पना घोडे,अजिनाथ खेडकर,राहुल गरकल, शिवराज राजेभोसले,वाल्मिक जाधव,भिमराज गिरमकर, संजय राऊत,रसूल पठाण,सुदर्शन पठाण,ईश्वर नरोटे,आकाश बारसकर,मनोज भोसले,विनायक सोनवले यांचेसह महिला प्रधान अभिकर्ते श्रीमती संगीता सुनिल शर्मा,सौ लालावंती गहिनीनाथ पालवे,श्रीमती दिपा महेश राज याचा विशेष गौरव करण्यात आला.

याप्रसंगी श्री संतोष यादव,श्री रामेश्वर ढाकणे,श्री गहिनीनाथ पालवे महाराज,श्री संदीप घोडके,श्री सतिष सोनवणे ,श्री भूमकर साहेब,यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संदीप हदगल तर आभार श्री महेश तामटे यांनी केले.

कार्यक्रमास  श्री बाळासाहेब बनकर,श्री अमित देशमुख यांचे सह मोठ्या संख्येने डाक कर्मचारी व महिला प्रधान अभिकर्ते उपस्थित होते.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post