प्राथमिक शिक्षक बँकेच्या सभासदांची सत्ताधा-याकडून मुस्कटदाबी..

 प्राथमिक शिक्षक बँकेच्या सभासदांची सत्ताधा-याकडून मुस्कटदाबी..

काळ्या फिती लावून  रोहोकलेप्रणित गुरूमाऊली मंडळाने केला जाहिर निषेध




नगर : प्राथमिक शिक्षक बँकेच्या सभासदांची सत्ताधा-याकडून मुस्कटदाबी केल्यामुळे

रोहोकलेप्रणित गुरूमाऊली मंडळाने काळ्या फिती लावून व निषेधाचे फलक दर्शवित जाहिर निषेध केला असून वार्षिक सर्वसाधारण सभा हि विरोधकांना मत मांडण्याच व्यासपीठ असते ते सत्ताधा-यांकडून उपलब्ध करून देणे अपेक्षित होते परंतु सभासदांना बोलून दिले जात नसल्यामुळे बँकेच्या सभेस्थळी  उपस्थित राहून निषेध व्यक्त घोटाळ्यावर घोटाळे करण्याचा

 विक्रम यांनी केला असल्याचा आरोप विकास डावखरे यांनी  केला.

जिल्हा प्राथमिक बँकेची सर्वसाधारण सभा अध्यक्ष सलीम पठाण यांच्या अध्यक्षतेखाली हॉटेल पँराडाइजवर आयोजित करण्यात आली होती.

   या सभेत विरोधकांसह सभासदांना बोलू दिले जात नसल्याने विरोधकांनी सभागृहात प्रवेश देण्याची मागणी केली होती.परंतु मुजोर सत्ताधा-यांनी हि मागणी फेटाळून लावत   हुकूमशाही वृत्तीचे प्रदर्शन पुन्हा एकदा  केले.

    यावेळी विकास डावखरे, प्रविण ठुबे,संजय शिंदे,संजय म्हस्के, राम निकम, बाबा पवार, संजय दळवी, संतोष खामकर, दशरथ ढोले, बाबासाहेब धरम,राजेंद्र ठुबे,बाळासाहेब वाबळे,गणेश वाघ,संतोष निमसे,

आदी उपस्थित होते.

     दरम्यान, शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रविण ठुबे म्हणाले की, विषय पत्रिकेत स्थळ जाहिर करणे आवश्यक असताना  काल पर्यत सभासदांना स्थळच माहिती नव्हते.त्यामुळे आजची शिक्षक बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा म्हणजे   सत्ताधाऱ्यांचा पोरखेळ झालेला दिसून आला.   

    बँकेच्या सत्ताधा-यांनी जसे घडयाळे खरेदी करण्यासाठी  गुजरातला गाठले तसे ऑनलाईन सभेसाठी तारांकित हॉटेल का निवडले हा मोठा  प्रश्न आहे. यांना फक्त घोटाळे घालण्यासाठी विषय लागतात. कशाला कशाचा पायपोस न राहिलेल्या सत्ताधाऱ्यांनी आता मुदत संपून गेल्यामुळे नैतिकता असेल तर राजीनामे देऊन पायउतार व्हावे असे आवाहन प्रवीण ठुबे यांनी केले.

विरोधी संचालकांना सुद्धा सभागृहाबाहेर ताटकळ ठेवून पुन्हा एकदा सत्ताधा-यांनी व्यक्तिदोषाचे प्रदर्शन घडवले असून जाणीवपुर्वक रोहोकले प्रणित संचालकांना काही काळ सभागृहाच्या बाहेर उभे करण्यांचाही यावेळी संजय म्हस्के यांनी निषेध व्यक्त केला

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post