महावितरणला शॉक, ग्रामपंचायतींच्या अधिकाराबाबत उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

 ग्रामपंचायतीशी पंगा घेणे महावितरणला जबरदस्त शॉक, न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या खंडपीठाने दिला निकाल. महावितरण कडून कर वसुली करण्यास ग्रामपंचायतीस अधिकार, माणगाव ग्रामपंचायतचे प्रश्न महत्वपूर्ण निकाल  नगर :- ग्रामपंचायत हद्दीत असणार्‍या महावितरणच्या पोल,ट्रान्सफॉर्मर,वीज उपकेंद्र,हाय टेन्शन टॉवर यांचा थकित कर वसुलीचा अधिकार ग्रामपंचायतीला अधिनियमातील त्या तरतुदीनुसार माणगाव ग्रामपंचायतीने अधिकाराचा वापर करून कर वसुली करावी असा महत्त्वपूर्ण आदेश हायकोर्टातील न्यायमूर्ती एफ. जे.काथावाला, न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या खंडपीठाने बुधवारी 11 ऑगस्ट रोजी दिला आहे.

 कोर्टाचा हा निर्णय अत्यंत महत्वपूर्ण ऐतिहासिक मानला जात आहे यासाठी माणगाव तालुका इचलकरंजी येथील अभ्यासू सरपंच व सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राचे पदाधिकारी डॉक्टर राजू मगदूम यांनी संपूर्ण ग्रामपंचायतीसाठी मोठे दिलासादायक काम केले असल्याने सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र बरोबरच राज्यातील अनेक सरपंचांनी डॉ.राजू मगदूम यांचे आभार मानले आहेत तर मा. उच्च न्यायालयाच्या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक निर्णयाचे देखील पेढे वाटून स्वागत करण्यात आले आहे.

       महावितरणची थकबाकी वसुली वरून अनेक ग्रामपंचायती व महावितरण विभाग यांच्यात तेढ निर्माण झाली होती तर राज्य सरकारने व प्रशासनाने देखील सरपंच ग्रामपंचायतींना वाऱ्यावर सोडून देऊन महावितरणची बाजू घेतल्यामुळे संपूर्ण राज्यात ग्रामपंचायत सरपंचामध्ये तीव्र नाराजी व असंतोष पसरला होता.  तर सरपंच परिषदेने अनेक ठिकाणी कंदील मोर्चा काढून व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी,महावितरणचे अधिकारी, गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन राज्य सरकारचा व महावितरणाचा निषेध केला होता तर इचलकरंजी तालुक्यातील माणगाव ग्रामपंचायती सरपंच डॉक्टर राजू मगदूम यांच्या पुढाकाराने व अभ्यासपूर्ण मांडणीने न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला होता. यावरून माणगाव ग्रामपंचायत आणि महावितरण यांच्यामध्ये न्यायालयीन लढाई सुरू होती.महावितरणकडे थकबाकीसाठी माणगाव ग्रामपंचायतीने न्यायालयात याचिका दाखल केली होती या याचिकेवर बुधवारी 11 ऑगस्ट रोजी अंतिम सुनावणी झाली.हायकोर्टाने माणगाव ग्रामपंचायतची बाजू खरी असल्याचे मान्य करीत याचिका निकाली काढली यामध्ये उच्च न्यायालयाने ग्रामपंचायतीस आपला कर गोळा करण्याचा अधिकार आहे,त्या अधिकाराचा वापर करून महावितरणकडची कराची थकबाकी वसूल करावी असे कोर्टाने नमूद केले आहे.

          


     सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राचे एक अभ्यासू व्यक्तिमत्व डॉक्टर राजू मगदूम यांनी न्यायालयामध्ये अभ्यासपूर्ण मांडणी करुन राज्यातील तमाम सरपंचांना न्याय मिळवून देण्याचे काम केले तसेच सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राच्या परिवारातील आहेच मात्र राज्यातील आजी माजी सरपंच,आजी माजी उपसरपंच,आजी माजी ग्रामपंचायत सदस्य,सरपंच परिषदेचे राज्यातील सर्व पदाधिकारी,जिल्हा पदाधिकारी,तालुका पदाधिकारी यांच्या वतीने न्यायालयात लढा  उभारल्याबद्दल आम्ही तितक्याच जिद्दीने पाठपुरावा केल्याबद्दल तमाम महाराष्ट्रातील गावकऱ्यांच्या वतीने त्यांचे धन्यवाद! डॉक्टर राजू मगदूम यांचा ग्रामपंचायतीमध्ये गाढा अभ्यास आहे.माणगाव सारखी ग्रामपंचायत त्यांनी राज्यामध्ये आदर्श केली आहे. सरपंच परिषदेमध्ये अभ्यासू व्यक्तिमत्त्व असल्याने राज्यातील सर्व सरपंचाचा आमचा विश्वास आहे.

 श्री.दत्ताभाऊ काकडे,प्रदेशाध्यक्ष,

 सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र.


       ग्रामपंचायतीच्या अधिकारातील निर्णय झाला आहे.ग्रामपंचायत हद्दीतील असणाऱ्या महावितरणच्या पोल,ट्रांसफार्मर,वीज उपकेंद्र,हायटेन्शन टॉवर यांचा थकित कर वसुलीचे अधिकार ग्रामपंचायतीलाच आहे.हा उच्च न्यायालयाने दिलेला आदेश म्हणजे माणगावकरांच्या व ग्रामपंचायत आणि सरपंच वर्गाच्या हक्काचा व एकजुटीचा विजय आहे.माणगावचे दिशादर्शक व आदर्श सरपंच व आपले सहकारी आणि सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राचे तत्वनिष्ठ सरपंच डॉक्टर राजू मगदूम यांनी यासाठी घेतलेले कष्ट व दिलेली धाडसी झुंज याबाबत सरपंच मुंबई महाराष्ट्राला विशेष आनंद व  अभिमान वाटत आहे.ग्रामपंचायतीच्या हक्कासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांच्या अहमदनगर जिल्ह्यातील तमाम सरपंच,उपसरपंच,सदस्य व पदाधिकार्‍यांच्या वतीने मनपूर्वक आभार.दत्ताभाऊ काकडे प्रांताध्यक्ष सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र,वकील विकास जाधव,प्रदेश सरचिटणीस सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र आणि राज्यातील सरपंच परिषदेचे सर्व पदाधिकारी यांचे योग्य मार्गदर्शनामुळे सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राच्या दत्ताभाऊ काकडे यांच्या कुशल नेतृत्वाखाली राज्यातील सर्व सरपंच ग्रामपंचायतीतील योग्य न्याय मिळवून देऊन सरपंचाचे न्याय हक्कासाठी व कर्तव्य साठी लढा देत आहेत संघटित सरपंच परिषदेच्या एकजुटीचा खऱ्या अर्थाने हा विजय आहे.

श्री.आबासाहेब सोनवणे,

अहमदनगर जिल्हा अध्यक्ष सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post