मित्रासोबत जुगारात हरलेली परत मिळवण्यासाठी खून

मित्रासोबत जुगारात हरलेली परत मिळवण्यासाठी खूनसातारा : गोळेश्वर येथे सापडलेल्या परप्रांतीय युवकाच्या खुनाचा पोलिसांनी उलगडा केला आहे. खुनाची कोणाचीही माहिती हाती नसताना पोलिसांनी १५ दिवसांत खुनाचा छडा लावून मृताच्या मित्रालाच बेड्या ठोकल्या आहेत. मित्रासोबत जुगारात हरलेली साडेनऊ हजारांची रक्कम परत मिळवण्यासाठी खून केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे, असे पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल  यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

इस्माईल शताबुद्धीन शेख (वय २५, रा. मंगळवार पेठ, मूळ रा. बालुग्राम झारखंड) असे मृताचे, तर मोहंमद सेटू आलम हिजाबुल शेख (२३, रा. इर्शादटोला, झारखंड) असे पोलिसांनी झारखंडहून अटक केलेल्याचे नाव आहे. इस्माईल व मोहंमद दोघांची झारखंडला शेजारी शेजारीच गावे आहेत. मोहंमद इस्माईलसोबतच झारखंडहून येथे मजुरीला आला होता. त्याच्यासोबत राहात होता.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post