राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात गोड चर्चा

 दिल्लीत मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज केंद्रीय गृहमंत्री आणि नव्याने निर्माण करण्यात आलेल्या सहकार खात्याचे मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. अमित शाह यांच्या कार्यालयात या दोन दिग्गज नेत्यांमध्ये सहकार श्रेत्रासह साखर उद्योग आणि त्यावरील प्रश्नांबाबच सविस्तर चर्चा झाली. तशी माहिती खुद्द शरद पवार यांनीच ट्विटरद्वारे दिली आहे. या बैठकीला नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरी लिमिटेडचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर आणि प्रकाश नाईकनवरे उपस्थित होते. पवार आणि शाह यांच्या बैठकीत प्रामुख्याने सहकारी साखर कारखान्यांना कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे? देशातील साखरेती सध्याची स्थिती आणि साखरेच्या जास्त उत्पादनामुळे उद्भवणाऱ्या समस्यांबाबत चर्चा झाल्याचं पवार यांनी आपल्या ट्वीटमधून सांगितलं आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post