वाढदिवस विशेष.. विधायक व विकासाची दृष्टी असणारा वारसा, कल्पक व आभ्यासू नेतृत्व :- मा.आ.चंद्रशेखर घुले पाटील

 कल्पक व आभ्यासू नेतृत्व :- मा.आ.चंद्रशेखर घुले पाटील       अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या स्थापनेत मोलाचा वाटा उचलून सामाजिक कार्याचा नवा इतिहास घडवणारे लोकनेते स्व.मारुतराव घुले पाटील यांचा विधायक व विकासाची दृष्टी असणारा वारसा त्यांचे सुपुत्र मा. आ.डॉ. नरेंद्र घुले पाटील व मा.आ.चंद्रशेखर घुले पाटील आज समर्थपणे चालवत आहेत. मितभाषी ,उत्तम निर्णायक क्षमता ,संयम,सुसंस्कृतपणा,दृढ निश्चय, जिद्द या गुणांच्या जोरावर मा.आ. मा.चंद्रशेखर घुले पाटील आज सर्वांचे चाहते बनले आहेत.

    एम.एस्सी.(कृषी) पर्यंतचा अभ्यासक्रम पूर्ण करत असताना त्यांनी स्टुडंट कोन्सिलच्या कार्यात स्वतःला झोकून दिले. विद्यार्थी दशेतच सामाजिक कार्याला सुरुवात केली. सर्वसामान्य माणूस विकासाचा केंद्रबिंदू मानून सामाजिक कार्यात त्यांनी आज प्रचंड आघाडी घेतली आहे. त्यांचा जनसंपर्क फार मोठा व प्रभावी आहे. माजीकेंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद  पवार यांचे विधायक विचार युवकांपर्यंत पोहचवून जिल्ह्यात  युवकांचे संघटन करण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. शेती व शेतीपूरक व्यवसायांना त्यांनी प्राधान्य दिले आहे. आज त्यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली कार्यरत ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना,श्री.मारुतरावजी घुले पा.शिक्षण संस्था,जनता शिक्षण प्रसारक मंडळ, शेवगाव बाजार समिती,जिनिंग प्रसिंग प्रकल्प या सर्व संस्था प्रगतीपथावर आहेत. चालू गळीत हगांमात ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने विक्रमी ऊस गळीत करुन महाराष्ट्रात उच्चांक प्रस्थापित केला आहे.दारिद्र्य व अज्ञानात खितपत पडलेल्या शेतकर्यांना विकासाकडे घेऊन जाण्याचे त्यांचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. गारपीटग्रस्त शेतकरी, दुष्काळात जनावरांसाठी चारा छावण्या, धरणग्रस्थांचे प्रश्न, जायकवाडी टप्पा दोन प्रकल्प, पाणी पुरवठा योजना इत्यादी सामान्य माणसाला दिलासा देणारे प्रश्न त्यांनी सत्तेत असताना मार्गी लावले. आज शेवगाव पाथर्डी मतदार संघात सत्तेत नसल्याने त्यांची उणीव शेतकरी, कष्टकरी यांना भासत आहे.

   शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदार संघाचे  प्रतिनिधित्व करताना त्यांनी केलेली विकासकामे आजही त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष देत आहेत. मतदार संघात वीज,पाणी,शिक्षण,रस्ते,तीर्थक्षेत्र विकास या क्षेत्रात त्यांनी भरीव कामे केली. स्वातंत्र्यनंतर पाथर्डीच्या दुर्गम भागात त्यांच्या प्रयत्नांमुळे वीज जाऊन पोहचली .शेवगाव तालुक्यात वाघोली, मळेगाव, ढोरजळगाव  येथील भव्य बंधारे, जमातखाने, आंबेडकर भवन , अनेक देवस्थानाचा विकास अशी छोटी मोठी अनेक कामे सांगता येतील. कुठल्याही राजकीय वादात पडून एकमेकांवर टीका करण्यापेक्षा सदैव कृतिशील राहून सामान्य माणसांची प्रगती साधण्यावर त्यांचा भर असतो.ज्ञानेश्वर कारखान्याचे सात हजार पाचशे मेट्रिक टनापर्यंत विस्तारीकरण,३२ मेगावॅट क्षमतेचा सहवीज प्रकल्प, अहमदनगर  सहकारी बँकेच्या माध्यमातून जायकवाडी धरणग्रस्त व गोदाकाठच्या शेतकर्यांना पाईप लाईनसाठी कर्ज पुरवठा, शेतकर्यांना वीज जोडणीसाठी कारखान्यामार्फत अर्थसाहाय,ऊस लागवडीसाठी प्रोत्साहन, ठिबक सिंचनासाठी अनुदान , ही सर्व लोकाभिमुख कामे पाहता विकास कार्याचा झंझावात शेतकरी ,कष्टकरी ,यांचे जीवनमान उंचावत ठेवणारा आहे. मा.आ.चंद्रशेखर घुले पाटील यांचे संघटन कौशल्य,विकासाची दूरदृष्टी,सामान्य माणसाच्या उन्नतीची तळमळ,धडाडी व कार्याची प्रचंड क्षमता पाहून मा.शरदराव पवार यांनी त्यांच्यावर राज्य साखर संघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी टाकली. राज्यातील साखर कारखानदारीला उर्जित अवस्था आणण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पेलली. ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन,जिल्हा सहकारी बँकेचे संचालक, डेक्कन शुगर टेक्नोलॉजीस्ट असोसिअशन चे सदस्य, शुगर टेक्नोलॉजीस्ट असोसिअशन ऑफ इंडिया चे सदस्य, अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष इत्यादी पदावर काम करताना त्यांनी आपले वेगळेपण वेळोवेळी सिध्द केले आहे. सत्ता ही सामान्य माणसाच्या प्रगतीसाठी वापरायची हा लोकनेते मारुतरावजी घुले पाटलांनी दिलेला मंत्र त्यांनी जीवापाड जपला आहे. त्यांचाच आदर्श घेऊन सौ. राजश्रीताई घुले पाटील या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तर डॉ. क्षितिज घुले पाटील शेवगाव पंचायत समितीच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्नशील आहेत.एकंदरीत मा.आ.चंद्रशेखर घुले पाटील यांनी अल्पावधीत केलेली विकास कामे आश्चर्यचकित करणारी आहेत. त्यांच्या कार्याचा आवाका मोठा आहे. त्यांची भविष्यातील वाटचाल दैदिप्यमान असणार आहे. हेच त्यांनी केलेल्या कार्यातून दाखवून दिले . छ . शिवाजी महाराज - फुले -शाहू - आंबेडकर यांचे पुरोगामी विचारच महाराष्ट्राला पुढे नेतील यावर त्यांची श्रध्दा आहे . अशी उत्तुंग विचारसरणी असलेले , कार्यकरर्यांना बळ देणारे , संकटांना न डगमगाणारे , आशावादी ;कल्पक व आभ्यासू नेर्तृत्वाला उंदङ व उत्तम आयुष्यासाठी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा

    शब्दांकन :भाऊसाहेब सावंत

संकलन -बाळासाहेब आरगडे

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post