पेट्रोल प्रमाणे घरगुती गॅस देखील हजारी पार होईल

 पेट्रोल प्रमाणे घरगुती गॅस देखील हजारी पार होईलविनाअनुदानित घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत २५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ही वाढ केल्यानंतर आता मुंबईत मिळणाऱ्या गॅसचे दर ८५९.५ वर पोहोचले आहेत. घरगुती गॅस सिलिंडरसोबत १९ किलो व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीतही ६८ रुपयांची वाढ करण्यात आली असून मुंबईत व्यवसायिक सिलिंडर १,५७९.५० रुपयांपर्यंत वाढला आहे.
१ जानेवारी ते १७ ऑगस्ट या काळात १६५ रुपयांनी गॅसच्या दरात वाढ झालेली आहे. १ मार्च २०१४ रोजी घरगुती गॅसची किंमत ४१०.५० एवढी होती. मोदी सरकारच्या काळात गॅसची किंमत दुपटीने वाढली आहे. ज्याप्रमाणे पेट्रोलची शंभरी पार करून दाखवली, त्याप्रमाणे मोदी सरकार आता घरगुती गॅसची लवकरच हजारी पार करेल, असेच चित्र दर महिन्यात वाढणाऱ्या दरवाढीमुळे दिसत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post