सोनिया गांधी, ममता बॅनर्जी यांना "ही' गोष्ट सांगा...फडणवीसांचा अशोक चव्हाणांना तिरकस सल्ला

सोनिया गांधी, ममता बॅनर्जी यांना सांगा...फडणवीसांचा अशोक चव्हाणांना तिरकस सल्लामुंबई :  मराठा आरक्षणासाठी घटना दुरुस्ती हवी असेल तर काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह 14 विरोधी पक्षांच्या नेत्यांना केंद्र सरकारला पत्रं लिहायला सांगा, असं सांगतानाच संविधानाच्या बेसिक स्ट्रकच्या बाहेर जाऊन केंद्र सरकारला घटना दुरुस्ती करता येत नाही. हे विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही माहीत आहे. त्यामुळे ते पत्र लिहिणार नाहीत, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. 

देवेंद्र फडणवीस यांनी नायगाव पोलीस वसाहतीतील पोलिसांच्या घरांची पाहणीही केली. त्यानंतर रहिवाशांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. त्यावेळी ते बोलत होते. संविधान संशोधन हवं ना मग काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, अखिलेश यादव यांच्यासह 14 विरोधी पक्षांना केंद्राला पत्रं लिहायला सांगितलं पाहिजे. संविधानाच्या बेसिक स्ट्रक्चरच्या बाहेर जाऊन केंद्राला संविधान दुरुस्ती करता येत नाही हे या सर्वांना माहीत आहे. इंदिरा सहानी प्रकरणात कोर्टाने ते अधोरेखित केलं आहे. हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे आपल्या जबाबदारीपासून पळू नका, असं फडणवीस यांनी सांगितलं. तसेच आरक्षणासाठी घटना दुरुस्ती करण्याकरिता पत्रं लिहिण्यावरून विरोधी पक्षात एकमत होणार नाही, असा दावाही त्यांनी केला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post