हिंदू बहुसंख्यांक असतील तोपर्यंतच टीकतील....

 हिंदू बहुसंख्यांक असतील तोपर्यंतच टीकतील.... भाजपा नेते आणि गुजरातचे उपमुख्यमंत्री नितिन पटेल यांनी शुक्रवारी एका ठिकाणी केलेल्या वक्तव्यावरुन नवीन वाद निर्माण झालाय. संविधान, धर्मनिरपेक्षता आणि कायदा या गोष्टी हिंदू बहुसंख्यांक असतील तोपर्यंतच टीकतील असं मत पटेल यांनी व्यक्त केलं आहे. हिंदू समाज अल्पसंख्यांक झाल्यानंतर हे काहीच शिल्लक राहणार नाही असं पटेल म्हणाले आहेत. पटेल यांनी गांधीनंगरमधील भारत माता मंदिरमध्ये बोलताना हे वक्तव्य केलं आहे. गुजरातमधील हे भारतमातेचं पाहिलेच मंदिर असल्याचं सांगण्यात येत आहे.


विश्व हिंदू परिषदच्या वतीने मूर्ति प्रतिष्ठापना महोत्सव आयोजित करण्यात आलाय. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या पटेल यांनी “देशामध्ये काही लोक संविधान, धर्मनिरपेक्षतेसंदर्भात बोलतात. मात्र आज तुम्ही हा व्हिडीओ रेकॉर्ड करायचा तर करा किंवा माझे शब्द लिहून ठेवा पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की जोपर्यंत हिंदू बहुसंख्यांक आहेत तोपर्यंतच संविधान, धर्मनिरपेक्षता आणि कायदा या गोष्टी भारतामध्ये अस्तित्वात असतील. ज्या दिवशी हिंदूंची संख्या कमी होईल आणि दुसऱ्यांची वाढू लागले तेव्हा धर्मनिरपेक्षता, लोकसभा, संविधान काहीच वाचणार नाही. सर्वकाही झुगारुन दिलं जाईल, गाडून टाकलं जाईल, काहीच शिल्लक राहणार नाही,” असं मत व्यक्त केलंय.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post