मनसेला धक्का...महिला जिल्हाध्यक्षांची पक्षाला सोडचिठ्ठी

 मनसेच्या महिला जिल्हाध्यक्षा अ‍ॅड. अनिता दिघे यांनी दिला पदाचा राजीनामानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला जिल्हाध्यक्षा अ‍ॅड. अनिता दिघे यांनी आपल्या पदाचा नुकताच राजीनामा दिला. अ‍ॅड. दिघे यांनी राजीनाम्याचे पत्र जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांना पाठविले आहे. 

अ‍ॅड. दिघे या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून शहरात सक्रीय होत्या. त्यांच्याकडे महिला जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांनी पक्षाच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य केले. तसेच महिलांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहिले. पक्षाने दाखवलेला विश्‍वास व दिलेली जबाबदारीबद्दल आभार मानून त्यांनी कार्यमुक्त होण्याची इच्छा राजीनामा पत्रातून व्यक्त केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post