आ.रोहित पवारांशी जवळीक अन्‌ भाजपच्या पदाचा राजीनामा....कर्जत जामखेड मतदारसंघात चर्चांना उधाण

 आ.रोहित पवारांशी जवळीक अन्‌ भाजपच्या पदाचा राजीनामा....कर्जत जामखेड मतदारसंघात चर्चांना उधाणनगर : माजी मंत्री प्रा.राम शिंदे यांचे कट्टर समर्थक असलेले भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर यांनी अचानक पदाचा राजीनामा दिल्याने मतदारसंघात चर्चेला उधाण आले आहे. राम शिंदे सध्या दिल्लीत असताना मतदारसंघातील या घडामोडी महत्त्वपूर्ण मानल्या जात आहेत. पदाचा राजीनामा दिलेल्या ढोकरीकर यांची राष्ट्रवादीशी वाढती जवळीकही आता चर्चेत आली आहे. पाच ऑगस्ट रोजी आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत ढोकरीकर यांच्या माध्यमिक विद्यालयात वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला होता. यावेळी शाळेतील शिक्षकांनी पूरग्रस्तांसाठी 11 हजारांची मदतही आ.रोहित पवारांकडे सुपुर्द केली होती. आ.पवार यांनी स्वत: या कार्यक्रमाचे फोटो आपल्या सोशल मिडियावर अकाउंटवर टाकले होते. याच गोष्टीमुळे शिंदे ढोकरीकर यांच्यावर नाराज झाल्याची चर्चा आहे. ढोकरीकर हे राम शिंदे यांच्याबरोबर सावलीसारखे राहतात. त्यांच्या निवडणुकीतही पडद्यामागून ढोकरीकर हेच सूत्र हलवायचे. कर्जत जामखेड मतदारसंघात येत्या काळात नगरपंचायत तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका होणार आहेत. ढोकरीकर यांच्या राजीनाम्याचे भाजपत निश्चितच पडसाद उमटू शकतील. त्यात ढोकरीकर यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचीही चर्चा सुरु झाल्याने शिंदे समर्थकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post