ढाकणे शैक्षणिक संकुलाच्यावतीने बडे हॉस्पिटलला अद्ययावत रूग्णवाहिकेची भेट

 रूग्णसेवेच्या विस्तारासाठी दिली जाणारी मदत लाखमोलाची : महेश डोके

ढाकणे शैक्षणिक संकुलाच्यावतीने बडे हॉस्पिटलला अद्ययावत रूग्णवाहिकेची भेटनगर : करोना महामारीमुळे वैद्यकीय सेवांचे सक्षमीकरण अत्यावश्यक बनले आहे. या काळात शासकीय तसेच खासगी आरोग्य यंत्रणेने उत्तम सेवा देत रूग्णांना दिलासा देण्याचे काम केले. या सेवांच्या विस्तारासाठी ढाकणे शैक्षणिक संकुलाने बडे हॉस्पिटलला अद्ययावत रूग्णवाहिका देवून मोलाचे काम केले आहे. या रूग्णवाहिकेचा भविष्यात रूग्णांना लाभ होईल तसेच त्यांना जलद उपचार मिळण्यास निश्चितच मदत होईल. सामूहिक प्रयत्नांतूनच आपण करोना सारख्या महामारीला यशस्वीरीत्या हरवू शकतो, असे प्रतिपादन शेवगाव तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश डोके यांनी केले.

शेवगावमधील नेवासा रोडवरील डॉ.बडे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलने करोना काळात रूग्णांची अविरत सेवा करीत हजारो रूग्णांना दिलासा दिला. त्यांच्या या सेवाकार्यात खारीचा वाटा उचलण्यासाठी केदारेश्वर ग्रामीण विकास प्रतिष्ठान, संगमनेर व ढाकणे शैक्षणिक संकुल, राक्षी, शेवगाव यांच्यावतीने अद्ययावत रूग्णवाहिकेची भेट देण्यात आली. या रूग्णवाहिकेच्या लोकार्पणप्रसंगी डोके बोलत होते. कार्यक्रमास माजी सभापती अरूण लांडे, ढाकणे शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अध्यक्ष तथा ग्रामसेवक युनियनचे राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे, सचिव जयाताई ढाकणे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत ढाकणे, ऋषीकेश ढाकणे, डॉ.सोमनाथ बडे, डॉ.शुभांगी बडे, डॉ.प्राचार्य बी.आर.अत्तार, ऍड. सानप साहेब, ग्रामसेवक युनियनचे अशोक नरसाळे,रामदास पाटील बडे, बबनराव पाटील बडे, संजय घुगे, शिवाजी फुंदे, त्र्यंबके भाऊसाहेब, शिवाजी महाराज देशमुख, नफीसखान पठाण आदी उपस्थित होते.

एकनाथ ढाकणे म्हणाले की, करोना महामारीने वैद्यकीय क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित झाले. अज्ञात अशा विषाणूशी सामना करताना डॉक्टर मंडळींनी स्वत:च्या जीवाची पर्वा केली नाही. डॉ.बडे हॉस्पिटलने या काळात असंख्य रूग्णांना ठणठणीत बरे करुन नवीन जीवन दिले. त्यांच्या या कार्यातून भविष्यात आणखी रूग्णांची सेवा घडावी यासाठी रूग्णवाहिका देण्यात आली आहे. शेवटी डॉ.सोमनाथ बडे यांनी आभार मानले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post