माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या चेअरमनपदी सुरेश मिसाळ, व्हा. चेअरमनपदी आण्णासाहेब ढगे यांची बिनविरोध निवड

 माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या चेअरमनपदी सुरेश मिसाळ, व्हा. चेअरमनपदी आण्णासाहेब ढगे यांची बिनविरोध निवडनगर : माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या चेअरमनपदी सुरेश मिसाळ तर व्हाईस चेअरमनपदी अण्णासाहेब ढगे यांची बिनविरोध निवड झाली आहे.  सहकार खात्याचे अधिकारी के. के. आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाच्या बैठकीत नूतन पदाधिकारी निवड करण्यात आली. चेअरमनपदासाठी मिसाळ यांच्या नावाची सूचना सत्यवान थोरे यांनी मांडली व त्यास अशोक ठुबे  यांनी अनुमोदन दिले. व्हा. चेअरमनपदासाठी ढगे यांच्या नावाची सूचना संजय कोळसे  यांनी मांडली व त्यास  धोंडिबा राक्षे यांनी अनुमोदन दिले. निवड प्रक्रियेसाठी संस्थेचे सचिव स्वप्निल इथापे यांनी सहाय्य केले.
नूतन चेअरमन मिसाळ म्हणाले की, संस्थेचा कारभार अधिकाधिक पारदर्शी व सभासदाभिमुख करण्याचा प्रयत्न राहिल.  कर्जाचा व्याजदर आणखी कमी करून ज्येष्ठ संचालक भाऊसाहेब कचरे यांच्या नेतृत्वाखाली पुरोगामी मंडळाच्या ध्येयधोरणानुसार पथदर्शी कारभार कायम राहिल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
व्हाईस चेअरमन ढगे म्हणाले की, पुरोगामी मंडळाचे दूरदृष्टीच्या कारभाराची प्रचिती संस्थेच्या उत्तम कारभारातून येत आहे. संस्थेच्या प्रगतीचा आलेख उत्तरोत्तर वाढतच आहे. सभासदांचा विश्वास सार्थ ठरवणारे काम संस्थेने नेहमीच केले असून तीच परंपरा यापुढेही कायम राखण्याचा प्रयत्न असेल.
प्रा.कचरे म्हणाले की, सध्या कर्जावरील व्याजदर 8 टक्के असून येणार्‍या काळात कर्जावरील व्याजदर आणखी कमी करण्याचा प्रयत्न राहील. 17 ऑगस्टपासून वाढीव कर्जमर्यादेच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरु होणार आहे. यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून परवानगी मिळालेली आहे. इतर पगारदार पतसंस्थेपेक्षाही आपल्या संस्थेचा नावलौकिक वाढलेला आहे. सभासदांचा विश्वास आणि सर्वोत्तम कारभार या माध्यमातून संस्थेची कायम प्रगती होत आहे. नूतन पदाधिकारीही याच परंपरेनुसार कारभार पाहतील असा विश्वास आहे.
यावेळी संचालक ज्ञानेश्वर काळे, ज्येष्ठ संचालक प्रा.भाऊसाहेब कचरे,चांगदेव खेमनर, काकासाहेब घुले, सूर्यकांत डावखर, धनंजय म्हस्के, बाबासाहेब बोडखे, दिलीप काटे, अशोक ठुबे, संजय कोळसे, सत्यवान थोरे, अनिल गायकर, कैलास राहाणे, धोंडीबा राक्षे, महेंद्र हिंगे, वसंत खेडकर, आशा कराळे, मनिषा म्हस्के, पुंडलिक बोठे, दिलावर फकीर, संस्थेचे सचिव स्वप्निल इथापे आदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post