देवीसिंग चंदाचाही खून करणार? ‘देवमाणूस’ मालिकेत येणार मोठा ट्वीस्ट

 देवीसिंग चंदाचाही खून करणार?, शेवटच्या टप्प्यावर आलेल्या मालिकेत येणार मोठा ट्वीस्टमुंबई : छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘देवमाणूस’ आता शेवटच्या प्रवासाकडे सुरु झाली आहे. मालिकेत आता आणखी काही नवे खुलासे होणार आहेत. या सगळ्यादरम्यान प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन होणार आहे. मालिकेत मोठ्या ट्वीस्टसह डॉ. अजित कुमार देव उर्फ देवी सिंग आता पोलिसांच्या तावडीत सापडणार असून, त्याला कडक शिक्षा देखील होणार आहे. मात्र, या आधी मालिकेत एक मोठा ट्वीस्ट येणार आहे.


मालिकेत देवीसिंगला आपल्या तालावर नाचवणाऱ्या चंदाचा आता खून होणार आहे. चंदाने वाड्यात आल्यापासून देवीसिंग उर्फ डॉ. अजित कुमार देव याला त्रास देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे डॉक्टरसोबतच डिंपल देखील वैतागली आहे. अशातच आता डिंपल आणि डॉक्टरच्या हातून चंदाचा खून झाल्याचे दाखवण्यात येणार असल्याचे कळते आहे. मात्र, आता मालिकेत पुढे नेमके काय घडते याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post