मोठी बातमी....पवारांच्या भेटीगाठी पाहता राष्ट्रवादी व भाजपा एकत्र येणारच!

मोठी बातमी....पवारांच्या भेटीगाठी पाहता राष्ट्रवादी व भाजपा एकत्र येणारच!



मुंबई - राज्यपाल भवनाच्या माध्यमातून समांतर सत्ताकेंद्र तयार करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप काल मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला. 

या पत्रकार परिषदेचा संदर्भ देत सामाजिक कार्यकर्त्या अंजली  दमानियांनी एक ट्विट केलं आहे. 

'जसं मिलिटरी अटॅक/रिट्रिट करताना कव्हर फायर देतात, तोच प्रकार आपण आज पाहिला. नवाब मलिक यांची पत्रकार परिषद फक्त पवार- शाह भेटीला एक कव्हर अप करण्यासाठी होता. बहुतेक ठाकरेंना दाखवायला की आम्ही भाजप विरुद्धच आहोत. राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येणार यात काहीच शंका नाही,' असं दमानियांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

काल अमित शहा आणि शरद पवार यांची दिल्लीत भेट झाली. त्याआधी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिल्लीत भेट घेतली होती. त्याच्या एक दिवस आधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले होते. या घटनाक्रमाबद्दलही दमानियांनी ट्विट केलं आहे. दमानियांनी केलेल्या ट्विटची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. भाजप-राष्ट्रवादी एकत्र येणार का, या चर्चेला दमानियांच्या ट्विटमुळे पुन्हा एकदा तोंड फुटलं आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post