क्रेडिट कार्डचे हप्ते थकले, महिलेकडे थेट शरीरसुखाची मागणी

 क्रेडिट कार्डचे हप्ते थकले, महिलेकडे थेट शरीरसुखाची मागणीक्रेडिट कार्डच्या हप्ता थकल्यामुळे महिलेकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबादमध्ये समोर आला आहे. इतकंच नाही तर क्रेडिट कार्डचा हप्ता चुकवल्यामुळे संबंधित महिलेला शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.

औरंगाबाद : क्रेडिट कार्डच्या हप्ता थकल्यामुळे महिलेकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबादमध्ये समोर आला आहे. इतकंच नाही तर क्रेडिट कार्डचा हप्ता चुकवल्यामुळे संबंधित महिलेला शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. तक्रारदार महिलेकडे भारतीय स्टेट बँक अर्थात SBI चे क्रेडिट कार्ड आहे. मात्र या कार्डचे हप्ते थकले होते.


क्रेडिट कार्डचे हप्ते थकून ते 20 हजार रुपयांपर्यंत पोहोचले. या थकीत रकमेसाठी संबंधित महिलेकडे शरीर सुखाची मागणी करण्यात आली. या प्रकारामुळे महिलेने थेट पोलिसात धाव घेत, तक्रार दाखल केली. मात्र तक्रारीनंतरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला नसल्याचं महिलेचं म्हणणं आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post