शहर जिल्हा अनुसूचित जाती काँग्रेस विभागाची कार्यकारिणी जाहीर

 अहमदनगर शहर जिल्हा अनुसूचित जाती काँग्रेस विभागाची कार्यकारिणी जाहीर ; 

अध्यक्ष नाथाभाऊ अल्हाट यांची घोषणा, आ. डॉ.तांबे, काळे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदानप्रतिनिधी : काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाची अहमदनगर शहर जिल्हा कार्यकारणी विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष नाथाभाऊ आल्हाट यांनी जाहीर केली आहे. शहर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात नुकत्याच पार पडलेल्या कार्यक्रमामध्ये आ.डॉ. सुधीर तांबे, शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले आहेत. 

यावेळी ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज गुंदेचा, शहर जिल्हा उपाध्यक्ष खलील सय्यद, शहर जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदे, विद्यार्थी काँग्रेसचे प्रभारी अनिस चुडीवाला, क्रीडा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते, युवक काँग्रेस अध्यक्ष ॲड.अक्षय कुलट, शहर जिल्हा खजिनदार मोहनराव वाखुरे, यांच्यासह ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर, जिल्हा बँकेच्या संचालिका अनुराधाताई नागवडे, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, युवक काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे, अजय मिसाळ आदी उपस्थित होते. 


अनुसूचित जाती काँग्रेस विभागाचे कार्यकारी पुढील प्रमाणे : शहर जिल्हाध्यक्ष - नाथा भाऊ आल्हाट, कार्याध्यक्ष - प्रताप थोरात, शहर जिल्हा उपाध्यक्ष - संतोष जगताप, शहर संघटक - प्रशांत भिंगारदिवे, शहर जिल्हा सरचिटणीस - गौतम सूर्यवंशी, शहर जिल्हा सचिव - दत्ता भालेराव, भिंगार विभाग अध्यक्ष - जितेंद्र जाधव, नवनागापूर विभाग अध्यक्ष - अविनाश कांबळे , महिला शहर जिल्हाध्यक्ष जयश्री सूर्यवंशी, शहर जिल्हा कार्याध्यक्ष सविता विधाते, नगर जिल्हा उपाध्यक्ष रेखा आरोळे, तालुका अध्यक्ष वर्षाताई भिंगारदिवे, शहर संघटक उज्वला गायकवाड आदींसह अन्य 30 पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली आहे. 


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post