भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार

 

राष्ट्रवादीच्या मेहबूब शेख यांचा आक्रमक पवित्रा, चित्रा वाघ यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रारमुंबई : ‘भाजपच्या नेत्या चित्रा वाघ  यांनी बीडच्या शिरुरमध्ये येऊन माझी नको ती बदनामी केली’, असा आरोप करत राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी चित्रा वाघ यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मेहबूब शेख यांनी बीडच्या शिरुर कासार पोलिस ठाण्यात चित्रा वाघ यांच्याविरोधात तक्रार दिली आहे.

“भाजपच्या नेत्या चित्रा वाघ 18 तारखेला शिरुरमध्ये आल्या होत्या. त्यांच्यासोबत असंख्य कार्यकर्ते होते. यावेळी माझी बदनामी व्हावी या हेतूने त्यांनी मला बलात्कारी म्हटलं तसंच माझ्यावर खोटे आरोप लावून माझी बदनामी केली”, असा आरोप मेहबूब शेख यांनी केला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post