जिल्हा परिषद कर्मचा-यांचे क्रांतीदिनी काळया फिती लावून कामकाज.


जिल्हा परिषद कर्मचा-यांचे ९ ऑगष्ट २०२१ या क्रांतीदिनी काळया फिती लावून कामकाज.

जिल्हा परिषद कर्मचा-यांच्या शासन पातळीवर विना निर्णय प्रदीर्घ कालावधीपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे लक्ष वेधून घेण्याच्या हेतूने महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन / जि.प. लेखा कर्मचारी संघटना/जि. प. आरोग्य सेवा कर्मचारी संघटना / आरोग्य सेवा समन्वय समिती व इतर मित्र सहकारी संघटनांची संयुक्त समन्वय कृती समिती वतीने शासनास दिलेले निवेदनाची प्रत यासोबत जोडली आहे.

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन ४३४० शाखा अहमदनगर च्या वतीने याबाबत जिल्हा परिषदेच्या सर्वच कर्मचा-यांनी या आंदोलनात सहभागी होणेचे आवाहन करण्यात येत आहे, कारण सर्व प्रवर्गातील या कॉमन मागण्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने केंद्रीय कर्मचा-यांप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता लवकर लागू करणे, एक तारखेला वेतन खात्यात जमा होणे, वेतनश्रेणीतील त्रुटी दूर करणे, नोव्हेंबर २००५ पासून नियमित सेवेत असलेल्या सर्व संवर्गातील कर्मचा-यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, पदोन्नतीच्या त्रुटी दूर कराव्यात, कर्मचा-यांची प्रलंबित देयके अदा करावेत इत्यादी सोबतच्या निवेदनानुसार सर्वच मागण्यांसाठी ९ ऑगष्ट क्रांतीदिनी काळया फिती लावून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर आंदोलन करणार आहोत, भोजन कालावधीत १५ मिनिटे घोषणा देऊन शासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे.

या अनुषंगाने युनियनचे राज्य समन्वयक श्री. मल्हारी कचरे, राज्य उपाध्यक्ष श्री. सुभाष कराळे, जिल्हाध्यक्ष श्री विकास साळुंके, सहसचिव श्री. राजेंद्र म्हस्के, केंद्रीय कार्यकारीणी सदस्य श्री. शशिकांत रासकर, राज्य समन्वयक श्री. सचिन कोतकर, जिल्हा समन्वयक श्री मोहन कडलग, श्री. विजय कोरडे, श्री. सुहास गोबरे, श्री. किशोर शिंदे, सहसचिव श्री गणेश पवार, उपाध्यक्ष श्री. सोमनाथ मिटे, कार्याध्यक्ष श्री कैलास भडके, श्री. भारत बोरुडे, श्री. प्रविण कू-हे, सुखदेव महाडीक, श्री.मनोज चोभे, श्री. शिवाजी मिटे, श्री. नारायण येवले, श्री. प्रदिप नन्नवरे, श्री. राजेद्र नायर, श्री. अभय गट, श्री. सारंग पठारे, विजय औटी, महिला प्रतिनिधी सौ. रजनी जाधव, सौ.भारती सांगळे, सौ. वैशाली कासार, सौ. मनिषा सटाणकर, श्री. उमाकांत भांड, इत्यादी पदाधिकारी यांनी याबाबत तालुका व जिल्हा स्तरावरील सर्व कर्मचा-यांना सदर आंदोलनात सहभागी होणेबाबत आवाहन केले आहे.

( विकास साळूंके) जिल्हाध्यक्ष

मोबा.८२७५५२२७२०

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post