ज्योती देवरे यांच्याप्रमाणेच राज्यातील अनेक महिला तहसीलदार मेसेज करतायत.... चित्रा वाघ यांचे मोठं वक्तव्य video

 ज्योती देवरे यांच्याप्रमाणेच राज्यातील अनेक महिला तहसीलदार मेसेज करतायत.... चित्रा वाघ यांचे मोठं वक्तव्य videoअहमदनगर- पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांचा ऑडिओ राज्यभर व्हायरल झाला होता. यात त्यांनी लोकप्रतिनिधी व महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले होते. या संदर्भात भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी आज पारनेर येथे जाऊन तहसीलदार ज्योती देवरे यांची भेट घेऊन चर्चा केली. तसेच अहमदनगरमध्ये येऊन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली.

पत्रकार परिषदेत चित्रा वाघ म्हणाल्या, पारनेर तहसीलदार ज्योती देवरे यांना लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी त्रास दिल्यावर त्याचा उद्रेक ऑडिओ क्लिपमधून झाला. ही क्लिप मी किमान 50 वेळा ऐकली. ही क्लिप राज्यातील सर्व महिलांनी नक्कीच ऐकली असेल. देवरे रडणाऱ्या नाहीत. लढणाऱ्या, भिडणाऱ्या आहेत. महिलेची कोंडी करायची लोकप्रतिनिधी समोर झुकवायला लावायचे, ही प्रवृत्ती योग्य नाही. मी देवरे यांना भेटले त्या मानसिकदृष्ट्या सावरल्या आहेत. लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली गुन्हा दाखल झालेला नाही. 
हे महाराष्ट्रात घडते आहे तालिबान पेक्षा येथे काही वेगळे होत नाही छत्रपती शिवाजी महाराज सावित्रीबाई फुले रमाबाई यांच्या नावाचा उल्लेख आता केवळ भाषणांत उरला आहे महिला सशक्तिकरण आचे नाव घेणाऱ्या पक्षातीलच आमदाराने असे वागणे कितपत योग्य आहे या आमदाराला महिलांना शिव्या देण्याचा अधिकार कुणी दिला महिला सशक्तिकरण चे नाव घेणारा पक्षाचे आमदार असे करतात शासकीय महिला कर्मचाऱ्याला शिव्या देतात हे कितपत योग्य आहे राज्यात 500 पेक्षाही जास्त महिला तहसीलदार आहेत त्यांना मी कधी भेटले नाही पण त्यांचे मेसेज येत आहेत तमाम तहसीलदारांचा ज्योती देवरे या आवाज आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post