करोना प्रतिबंध लसी किती काळ संरक्षण देतात? संशोधनातून झाला खुलासा

 

करोना प्रतिबंध लसी किती काळ संरक्षण देतात? संशोधनातून झाला खुलासाकोरोना प्रतिबंधक लसी गुणकारी आहेत खऱ्या परंतु त्या कोरोनाविरोधात फार काळ रक्षण करू शकत नाहीत. ठरावीक कालावधीनंतर लसींची परिणामकारकता क्षीण होत जाते, असे संशोधनात आढळून आले आहे. अमेरिकेत वाढत्या कोरोनाच्या संख्येवरून हे लक्षात येऊ लागले आहे. सीडीसीने १ मे ते २५ जुलै या कालावधीत केलेल्या आणखी एका अभ्यासात लसीकरण न झालेल्या लोकांना कोरोनाचा अधिक धोका असल्याचे निष्पन्न झाले.  अभ्यासात लसीकरण न झालेल्या लोकांना लसीकरण झालेल्या लोकांच्या तुलनेत ३० पट धोका असतो, असे दिसून आले. साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवणाऱ्या सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रीव्हेन्शन (सीडीसी) यांनी अमेरिकेतील सहा राज्यांमधील ४,००० आरोग्य कर्मचाऱ्यांचा अभ्यास केला. त्यात कोरोनाच्या डेल्टा या व्हेरिएंटच्या उद्रेकानंतर लसींचा प्रभाव कमी झाल्याचे आढळून आले. ज्यांचे संपूर्ण लसीकरण झाले आहे अशा लोकांमध्ये लसीकरणाच्या सुरुवातीच्या काळात प्रतिकारशक्ती चांगली होती. मात्र, कालौघात ही प्रतिकारशक्ती कमी झाली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post