शिक्षकांच्या पगारासाठी भिक मागो आंदोलन

 शिक्षकांच्या पगारासाठी भिक मागो आंदोलन- शहराध्यक्ष प्रसाद शिंदेपुरोगामी महाराष्ट्र शिक्षकांना  भिक मागण्याची वेळ आली आहे असे प्रतीपादन
कास्ट्राईब शिक्षक शिक्षकेतर संघटना शहराध्यक्ष प्रसाद शिंदे यांनी केले. या संदर्भात कास्ट्राईब शिक्षक संघटना ,व महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना आंबादास शिंदे ,पारुनाथ ढोकळे, यांचे  वतीने   मुख्यमंत्री   उद्धवजी ठाकरे साहेबांना निवेदन पाठविले आहे. 
त्यामध्ये
शासन निर्णय दिनांक १५/०२/२०२१ अन्वये 20 टक्के अनुदान सुरू असलेले परंतु 40% अनुदानास  अपात्र ठरलेल्या खाजगी प्राथमिक शाळा तुकड्यांचे वेतन सुरू करावे. 20 टक्के अनुदान प्राप्त शाळांना 40 टक्के अनुदानासाठी  काही कागदपत्रे अभावी अपात्र करण्यात आले. सदर शाळा या २० टक्के अनुदान पात्र असून सदर शाळांनी शासनाने दिलेल्या त्रुटी पूर्ततेसाठी प्रस्ताव सादर करुन योग्य ते कागदपत्रे सादर केले  आहेत. या वेळी अपात्र झालेल्या शाळांचे 20 टक्के प्रमाणे होत असणारे वेतन थांबवले आहे. वेतन अधीक्षक कार्यालयाकडून तोंडी आदेशाद्वारे सदर शाळांचे वेतन थांबवले आहेत.  याबाबत शिक्षकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे मिळणारा पगार हा  ८ हजार असून यासाठी शिक्षकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला जात आहे.शासनाने दिलेल्या वेळेत त्रुटींची पूर्तता करून देखील शासनाकडून अध्याप पात्र शाळांच्या याद्या जाहीर झालेल्या नाहीत. 
12 अॉगस्ट पर्यंत सदर गोष्टींचा विचार शासनाने केला नाही तर संघटनेच्या माध्यमातून  शिक्षक १७ ऑगस्ट २०२१  रोजी सर्व शासकीय कार्यालयात,आमदार कार्यालय,खासदार कार्यालय उपोषण भीक मागो आंदोलन करणार आहोत.या प्रसंगी कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष संतोष काळापहाड,सुरज घाटविसावे,शिक्षक सेना जिल्हाध्यक्ष अंबादास शिंदे ,शहराध्यक्ष पारुनाथ ढोकळे.कांतीलाल खुरंगे,रविंद्र आगलावे,शहराध्यक्ष प्रसाद शिंदे,रवी चांदेकर,अशोक शिरसाठ , सर्व पदाधिकारी यांचे वतिने मा.जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी निवेदन देण्यात आले

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post