चिचोंडी पाटीलमध्ये पविते अर्पण सोहळा उत्साहात साजरा

 चिचोंडी पाटील मध्ये पविते अर्पण सोहळा उत्साहात साजरा       नगर :  नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील श्रीकृष्ण मंदीरात पविते अर्पण सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . दरवर्षी नारळी पौणिमेच्या पूर्व संध्येस भाविक भक्त भागवान श्रीकृष्णास पविते रूपी राखी परमेश्वरा स अर्पण करतात . परंपरेनुसार  श्रीफळ, सुपारी, दोरा, लोकर आदी सह अन्य वस्तु चा उपयोग करून भक्त जन पविते तयार करून नारळी पौणिमेच्या पूर्वसंध्येस पविते पर्वास प्रारंभ होतो तो श्रीकृष्ण जन्माष्टमी पर्यंत सुरु राहतो .

             चिचोंडी पाटील चे पुजारी पुज्यनिय धाराशीवकर बाबा उर्फे वसंतराव ठोंबरे ( चिचोंडीकर ) यांच्या हस्ते सकाळी तिर्थस्थानास मंगल स्नान घालण्यात आले . यावेळेस  पुजारी हरिभाऊ ठोंबरे, लक्ष्मीकांत ठोंबरे, रमेश ठोंबरे, संजय ठोंबरे, चक्रपाणि ठोंबरे, राजेंद्र ठोंबरे , उषाबाई  ठोंबरे, वृषाली ठोंबरे, स्मिता ठोंबरे, शैलजा ठोबरे,भाग्यश्री ठोंबरे, मोहिणी ठोंबरे आदी उपस्थित होत्या .

           रात्री आठ वाजता विडा अवसर करून चिचोंडी पाटील  आणि धामणगांव (ता. आष्टी ) येथील भाविक भक्त यांच्या उपस्थित पविते अर्पण करून पविते पर्वाचा आरंभ करण्यात आला . यावेळी हभप गंगाधर दरेकर , सुनिल शिंदे, आदित्य शिंदे, वंदना शिंदे, मिना औटी, मयुरी उदरभरे  ,प्रियंका शिंदे , सुप्रिया शिंदे, धामनगाव ता आष्टी येथील बेलाजी बोराडे, देवीचंद बोराडे, भूषण बोराडे , समृद्धी बोराडे, प्रथमेश बोराडे , स्नेहल बोराडे , शौर्य बोराडे, अर्चना बोराडे,  ऋषिकेश ठोंबरे, आनंद ठोंबरे, सुदर्शन ठोंबरे, सुयश ठोंबरे, निखिल  ठोंबरे, तेजस ठोंबरे, अनिकेत औटी, प्रमोद ओटी, सार्थक ठोबरे, प्राची उदरभरे, समीक्षा उदरभरे, श्रेया उदरभरे आदी सह पुजारी बांधवांनी परमेश्वर चरणी पविते अर्पण केले . 

           नारळी पौणिमेच्या पूर्व संध्येस सुरु झालेले पविते पर्व हे श्रीकृष्ण जन्माष्ठमी पर्यत सुरु राहते .  याकाळात राज्यातील विविध ठीकाणचे भक्तगण मोठ्या भक्तिभावाने  पविते अर्पण करतात .

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post