दोन शिवसैनिकांची हत्या...कर्नाटकात पलायन केलेल्या पाच जणांना अटक

दोन शिवसैनिकांची हत्या...कर्नाटकात पलायन केलेल्या पाच जणांना अटक सोलापूर -   मोहोळ येथे राष्ट्रवादीच्या  काही कार्यकर्त्यांकडून दोन शिवसैनिकांची हत्या  करण्यात आली होती. आरोपींनी टेम्पो दुचाकीवर घालून ही हत्या केली होती. हत्या करून हा अपघात असल्याचा बनाव आरोपींकडून रचला होता. हत्या केल्यानंतर संबंधित आरोपींनी कर्नाटकात पलायन केलं होतं. घटनेच्या 20 दिवसांनंतर पोलिसांनी 5 संशयित आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

संतोष सुरवसे, रोहित फडतरे, पिंटू सुरवसे, आकाश बरकडे आणि संदीप सरवदे अशी आरोपींची नावे आहेत. तर सतीश नारायण क्षीरसागर आणि विजय सरवदे असं हत्या झालेल्या शिवसैनिकांची नावं आहेत. आरोपींनी 15 जुलै रोजी रात्री उशीरा दुचाकीवरून जाणाऱ्या या दोघांची हत्या केली होती. याप्रकरणी पोलिसांनी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतोष जनार्दन सुरवसे, रोहित ऊर्फ अण्णा अनिल फडतरे, पिंटू जनार्दन सुरवसे, आकाश बरकडे, संदीप सरवदे आणि टेम्पो चालक भय्या असवले यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. टॅम्पोचालक भय्या असवले याला पोलिसांनी त्याच दिवशी अटक केली होती. त्यानंतर आता अन्य पाच आरोपींना पोलिसांना ताब्यात घेतलं आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post