लाच प्रकरणी अडकलेल्या महिला शिक्षणाधिकार्‍याकडे आढळली भली मोठी संपत्ती

लाच प्रकरणी अडकलेल्या महिला शिक्षणाधिकार्‍याकडे आढळली भली मोठी संपत्तीनाशिक :   नाशिकमध्ये  8 लाख रुपयांची लाच  स्वीकारल्या प्रकरणी  जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर झनकर यांना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. दरम्यान पथकानं त्यांच्या घराची झडती घेतली असता  झनकर यांच्या नावावर सुमारे तीन एकर जमीन आणि चार फ्लॅट अशी स्थावर मालमत्ता आढळून आली आहे.

  झनकर यांच्या नावावर शहरातील शिवाजीनगर भागात, गंगापूररोड, मुरबाड, गंधारे कल्याण असे प्रत्येकी एक याप्रमाणे चार फ्लॅट आहेत. सिन्नर , कल्याण-मिलिंदनगरमध्ये  सुमारे 3 एकर अशी स्थावर मालमत्ता आढळून आली आहे. 40 हजारांची रोख रक्कम आढळली असून एक होंडा सिटी कार, एक ॲक्टिवा दुचाकी अशी वाहनं आहेत. घराच्या झाडाझडतीत अधिकाऱ्यांनी एसबीआय, बँक ऑफ बडोदा, सिटी युनियन बँक, पंजाब नॅशनल बँकेसह इत्यादी बँकांचे पासबुक जप्त केलेत. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post