खळबळजनक...दोन चिमुरड्यांचा गळा दाबून खून करीत मातेचा आत्महत्येचा प्रयत्न

खळबळजनक...दोन चिमुरड्यांचा गळा दाबून खून करीत मातेचा आत्महत्येचा प्रयत्न कराड : दोन चिमुकल्या मुलांचा गळा दाबून खून करून मातेने स्वतः विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. कराड शहरात बुधवारी दुपारी घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली असून मातेची प्रकृती गंभीर आहे. तिच्यावर कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, चार महिन्यांपूर्वी अपघाती निधन झालेल्या पतीच्या विरहामुळे आपण हे कृत्य करीत असल्याची चिट्ठी त्या महिलेने लिहून ठेवली असून पोलिसांनी ती ताब्यात घेतली आहे.


कुटुंबातील कर्त्या पुरुषाचा काही महिन्यांपूर्वी अपघाती मृत्यू झाला आहे. त्यानंतर पत्नीसह दोन मुले त्याठिकाणी राहत होती. मात्र पतीच्या निधनामुळे आपण व्यथित झालो असून त्यांच्याशिवाय जगण्यात अर्थ नाही, अशी चिठ्ठी लिहून ठेवून संबंधित महिलेने बुधवारी दुपारी विषारी औषध प्राशन केले. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर नातेवाईकांसह नागरिकांनी घरात धाव घेतली. त्यावेळी महिलेची दोन्ही मुले मृतावस्थेत आढळून आली. तर महिलेची प्रकृती गंभीर होती. नातेवाईकांनी तातडीने तिला कृष्णा रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी तिच्यावर उपचार सुरू आहेत. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post