तालीबानी येताच पाकमधील कट्टरपंथी बिथरले......महाराजा रणजितसिंह यांच्या पुतळ्याची नासधूस

पाकिस्तानात कट्टरपंथियांचा धुडगुस...महाराजा रणजितसिंह यांच्या पुतळ्याची नासधूस नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये आता आणखी एका प्रतिकाची तोडफोड करण्यात आली आहे. लाहोरमधील महाराजा रणजीत सिंह यांच्या प्रतिमेची पुन्हा एकदा नासधुस करण्यात आली आहे. तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान (टीएलपी) संघटनेशी निगडीत एका व्यक्तीवर हा पुतळा तोडण्याचा आरोप आहे. याबाबत केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्हटलंय की, आज लाहोरमधील महाराजा रणजीत सिंह यांच्या प्रतिमेची नासधुस करण्याच्या प्रकाराची माहिती मिळाली आहे. २०१९ मध्ये या पुतळ्याचं अनावरण झाल्यानंतर तिसऱ्यांदा या प्रकारची घटना घडली आहे. अल्पसंख्याक समुदायाविरोधातील हिंसाचाराच्या घटना, ज्यात त्यांची प्रार्थनास्थळे, त्यांचा सांस्कृतिक वारसा आणि त्यांच्या खाजगी मालमत्तेवरील हल्ल्यांचा घटनांमध्ये गतीने वाढ होत आहे. अगदी गेल्या १२ दिवसांपूर्वी एका झुंडीकडून गणपती मंदिराची तोडफोड करण्यात आली होती. अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यामध्ये पाकिस्तानी शासनाला पूर्णपणे अपयश आलं आहे. आम्ही पाकिस्तान सरकारला त्यांच्या अल्पसंख्यांक समुदायाची सुरक्षा, कल्याणाची काळजी घेण्याचं आवाहन करतो

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post