नगर तालुक्यात विहिरीत पडला कोल्हा...वन विभागाने घेतली धाव


नगर तालुक्यात विहिरीत पडला कोल्हा...वन विभागाने घेतली धाव अहमदनगर मधील  पिंपळगाव माळावी येथील  नंदन कानन फार्म मधील   मधुसूदन खंडेलवाल व जितेंद्र खंडेलवाल यांनी निसर्गमित्र  ऋषिकेश लांडे यांना संपर्क साधून खंडेलवाल यांच्या पिंपळगाव येथील शेततळ्यात कोल्हा पडला असल्याचे कळवले. 

त्यानंतर लगेचच  वनविभागातील अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता क्षणाचाही विलंब न करता वन विभागाचे एक बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले .निसरड्या झालेल्या शेततळ्यात आपल्या जीवाची पर्वा न करता वनविभागाचे पथक उतरले. परंतु घाबरलेला कोल्हा  पाण्यात पोहून कर्मचार्यांपासून दूर गेला. असा प्रकार तीन ते चार वेळा झाला. 

सुमारे दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर त्यांनी अतिशय कौशल्याने  प्राण्याला जाळी मध्ये अडकवले व पाण्यातून बाहेर काढले. त्यानंतर लगेच कोल्ह्याची प्राथमिक तपासणी करण्यात आली. सुदैवाने प्राण्याला कोणतीही दुखापत झालेली नसल्यामुळे त्याला निसर्गात मुक्त करण्यात आले. शेत तळ्यात उतरून जीवाची बाजी लावून कोल्ह्याला जीवदान देणाऱ्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांचे आणि निसर्गप्रेमी मित्रांचे कौतुक सध्या सर्वत्र केले जात आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post