दहावी, बारावी पुरवणी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

दहावी, बारावी पुरवणी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर 



मुंबई: शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षांच्या तारखांसदर्भात महत्वाची घोषणा केली आहे. कोरोना विषाणू ससंर्गामुळं महाराष्ट्र सरकारनं दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. पर्यायी मूल्यांकन धोरणानुसार बोर्डानं निकाल जाहीर केले होते. या निकालामध्ये उत्तीर्ण न झालेले विद्यार्थी आणि ए.टी.के.टीशाठी पात्र विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा सप्टेंबर-ऑक्टोंबर महिन्यात घेण्यात येणार आहे. राज्य माध्यमिक शिक्षण मंडळानं यांसदर्भातील तारखा जाहीर केल्या आहेत. 

बोर्डानं जारी केलेल्या परिपत्रकानुसार माध्यमिक शालान्त परीक्षा म्हणजेच दहावीची परीक्षा बुधवारी 22 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या कालावधीमध्ये होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी अर्ज केला आहे त्यांनी यासंदर्भात त्यांच्या शाळेशी संपर्क साधून आवश्यक माहिती घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच बारावीच्या सर्वसाधारण अभ्यासक्रमांची परीक्षा 16 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर या कालावधीत पार पडेल. या शिवाय बारावीच्या व्यवसाय अभ्यासक्रमांची परीक्षा 16 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या दरम्यान घेण्यात येईल, अशी माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post