तहसीलदार देवरे आक्रमक, त्या महसूल कर्मचार्यांवर कारवाईची मागणी

 *तहसीलदार देवरे यांची २७ महसूल कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणीनगर : तहसीलदार ज्योती देवरे यांची बदली करा अथवा आमच्या सर्वाच्या पारनेर तालुक्यातून बदल्या करा असे म्हणत पारनेर तालुक्यातील महसूल कर्मचारी व तलाठी काम बंद आंदोलन करत आहेत. यातील काही कर्मचारी आंदोलन स्थळीही नाहीत व कामावरही नाहीत, असा आरोप करत तहसीलदार देवरे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे संबंधित कर्मचारी व तहसीलदारांवर कारवाईची मागणी केली आहे. कारवाईच्या मागणीचे पत्र आज तहसीलदार देवरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले. यात २७ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली असून त्यांच्या नावाची यादीच जिल्हाधिकाऱ्यांना पुराव्यासह सादर केली आहे.

पत्रात म्हटले आहे की, पारनेर तालुक्यातील महसूल कर्मचारी व तलाठी, मंडळाधिकारी हे २५ ऑगस्टपासून पारनेर तहसील कार्यालयाच्या आवारात कामबंद आंदोलन करत आहेत. या बाबतचा अहवाल ईमेलव्दारे दररोज कळविण्यात आलेला आहे. परंतु या आंदोलनात किती कर्मचारी सहभागी झालेले आहेत. याबाबत संघटनेमार्फत कोणताही अहवाल तहसील कार्यालयात प्राप्त झालेला नाही. त्याअनुषंगाने आज दि.३१/८/२०२१ रोजी सकाळी ११:५० वाजता किती कर्मचारी आंदोलनस्थळी उपस्थित आहेत. याबाबत खात्री केली असता एकूण ८३ मंजूर पदांपैकी आंदोलनस्थळी ३२ कर्मचारी उपस्थित असल्याचे निदर्शनास आलेले आहे. चारही नायब तहसीलदारांच्या समवेत खातरजमा करण्यात येऊन समक्ष उपस्थित ३२ कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या आहेत. तलाठी यांचेकडील संघटनेच्या रजिष्टरवर तसा शेरा मारण्यात आला आहे. उर्वरीत कर्मचारी कार्यालयात देखील कार्यरत नसलेचे दिसून येते. हे कर्मचारी यांनी कार्यालयातील अनुपस्थितीबाबत कोणत्याही कार्यालयास अवगत केलेले नाही. तरी जे कर्मचारी आंदोलन स्थळी उपस्थित नाहीत व कार्यालयामध्येही उपस्थित नाहीत असे २७ कर्मचारी आहेत.

तालुक्यात आपत्ती व्यवस्थापन (कोविड - १९ नैसर्गिक आपत्ती) व पुरवठा विषयाचे अत्यावश्यक सेवेसंबंधी कामकाज ठप्प आहेत. त्यामुळे वरील बाबींची तातडीने दखल घेऊन संबंधितांवर प्रशासकीय कारवाई करणेत यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post