रितेश देशमुख होणार मुंबईचे महापौर? कॉंग्रेसची रणनिती

रितेश देशमुख होणार मुंबईचे महापौर? कॉंग्रेसची रणनिती मुंबई :   मुंबई महापालिका निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आल्या आहेत. बीएमसी इलेक्शनसाठी ‘एकला चलो रे’चा नारा दिलेल्या काँग्रेसने आता मुंबईच्या महापौरपदासाठीही जोरदार मोर्चेबांधणी सुरु केल्याचं दिसत आहे. काँग्रेसच्या स्ट्रॅटेजी कमिटी सचिवांकडून नुकताच याबाबत एक अहवाल सादर करण्यात आला. 


मुंबई काँग्रेस स्ट्रॅटेजी कमिटी सचिव गणेश कुमार यादव यांनी हा अहवाल सादर केला आहे. या अहवालात मुंबईच्या महापौरपदासाठी काही नावांचा विचार करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यात बॉलिवूडमध्ये मराठी पताका फडकवणारा अभिनेता रितेश देशमुख , मॉडेल-अभिनेता मिलिंद सोमण   आणि लॉकडाऊनच्या काळात अडकलेल्या कामगारांना घरी पोहोचवण्यासाठी मदतीचा हात देणारा अभिनेता सोनू सूद  यांसारख्या सेलिब्रिटींचा समावेश असल्याची माहिती आहे. मात्र अद्याप रितेशसह कुठल्याच अभिनेत्याची यावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post