दोन एकरात गांजा लागवडीची परवानगी द्या, शेतकर्‍याची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

दोन एकरात गांजा लागवडीची परवानगी द्या, शेतकर्‍याची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी सोलापुर: एक शेतकऱ्याने जिल्हाधिकारी यांना पत्र लिहून दोन एकर गांजा लावण्यास परवानगी द्या अशी  मागणी केली आहे. या शेतकऱ्याचे नाव अनिल पाटील असे आहे.

शेतकऱ्याची शिरपूर ता. मोहोळ येथे स्वतःच्या मालकीची 2 एकर जमीन असून या 2 एकर क्षेत्रात गांजा लावण्यासाठी प्रशासनाने परवानगी द्यावी अशी विनंती त्यांनी केली आहे. कोणतेही पीक लागवड केले तरी त्याला शासनाचा हमीभाव मिळत नसल्यामुळे त्याला त्याची शेती तोट्यात करावी लागत आहे.

पिकाला कवडीमोल भाव मिळत आल्यामुळे शेती करणे कठीण झालं. मशागतीसाठी केलेला खर्च देखील मिळत नाही. तसेच एखाद्या साखर कारखाण्याला ऊस गाळपासाठी दिला असता, त्याचे देखील बिल लवकर मिळत नाही, त्यामुळे गांजाला भाव असल्यामुळे या शेतकऱ्याने दोन एकर गांजा लागवड करण्यासाठी जिल्हा अधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे मागणी केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post