जन आशिर्वाद यात्रेदरम्यान नारायण राणेंना बसला ‘शॉक’, प्रवीण दरेकरही दचकले...

जन आशिर्वाद यात्रेदरम्यान नारायण राणेंना बसला ‘शॉक’, प्रवीण दरेकरही दचकले... कणकवली : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकसत्रामुळे रखडलेली जनआशीर्वाद यात्रा पुन्हा एकदा सिंधूदूर्गातून सुरु झाली आहे.कणकवलीमध्ये जनआशीर्वाद यात्रेदरम्यान नारायण राणे यांना विजेचा धक्का बसला आहे. कणकवलीमधील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी जात असताना रेलिंगला लावण्यात आलेल्या विद्युत रोषणाईला हात लावला असता नारायण राणे यांना इलेक्ट्रीक शॉक लागला आहे. सुदैवाने या घटनेमध्ये राणेंना कसलीही गंभीर दुखापत झाली नाहीये. त्यांच्या मागे असलेले प्रवीण दरेकर यांनीही शिताफिने रेलिंगला लावलेला आपला हात मागे घेतल्याचं दिसून आलं. सध्या पावसाळ्याचे दिवस असून त्यात केलेली ही विद्युत रोषणाई किती महागात पडू शकते, हे दिसून आलं.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post