राज्यात 17 ऑगस्टपासून शाळा नाहीच...शिक्षण विभागाच्या निर्णयाला स्थगिती


राज्यात 17 ऑगस्टपासून शाळा नाहीच...शिक्षण विभागाच्या निर्णयाला स्थगिती मुंबई - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पुन्हा खबरदारी घेण्यास सुरूवात केली आहे. येत्या १७ ऑगस्टपासून शाळा सुरू करण्यात येतील असा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याची घोषणा केली होती. मात्र टास्क फोर्सच्या बैठकीत शिक्षण विभागाच्या या निर्णयाला विरोध करण्यात आला. 


टास्क फोर्सनं शिक्षण विभागाच्या निर्णयावर आक्षेप घेतल्याने शाळा सुरू होणार की नाही याबाबत संभ्रम कायम होता. मात्र आता राज्य सरकारने शाळा सुरु होण्याबाबत जो निर्णय घेतला होता त्या जीआरला स्थगिती दिली आहे. पालकांकडून शाळा सुरु करण्याबाबत शिक्षण विभागाने सर्व्हे घेतला होता. त्यात ८० टक्के पालकांनी शाळा सुरु कराव्यात असा कौल दिला होता. सर्व्हेच्या आधारावर शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी तुर्तास हा निर्णय थांबवला असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर आता राज्य सरकारने शिक्षण विभागाच्या या निर्णयाला स्थगिती दिल्यानंतर आता १७ ऑगस्टपासून शाळा सुरू होणार नाहीत. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post